रिमडिसिवर इंजेक्शनसाठी त्रागा करू नका , खासदार अमोल कोल्हे यांचे नागरिकांना आवाहन ; पर्यायी औषधही नागरिकांना सुचविले


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर रिमडिसिवर इंजेक्शन घेण्याचा सल्ला देतात. परंतु रिमडिसिवर इंजेक्शनचे उत्पादनच बंद झाल्याने ते आता सहज उपलबध्द होत नाही.inject remedicine for injection,MP Amol Kolhe’s appeal to the citizens; Alternative medicine was also suggested to the citizens

त्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पर्यायी औषध सुचविले असून ते रुग्णांना देण्याचा सल्ला नागरिकांना दिला.डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, रिमडिसिवर इंजेक्शन हे जीवनरक्षक औषध नाही. मात्र, शरीरातील कोरोना विषाणूंचा भार ते कमी नक्कीच करते.



अर्थात आता रिमडिसिवर इंजेक्शन मिळत नाही. पण, नागरिकांनी त्रागा करून घेऊ नये. रिमडिसिवर इंजेक्शनला पर्यायी औषध आहे. फेव्हीपॅरावीर असे पर्यायी औषधांचे नाव आहे. हे औषध तोंडावाटे रुग्णांना द्यायचे आहे. जे तोंडावाटे औषध घेऊ शकतात त्यांना फेव्हीपॅरावीर हे औषध द्यावे.

त्यामुळे शरीरातील कोरोना विषाणूचा भार कमी होईल. विशेष म्हणजे फेव्हीपॅरावीर औषधांचा साठा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कोव्हिड टास्क फोर्सनेही फेव्हीपॅरावीर हे औषध सुचविले आणि ते उपलब्ध असताना त्याचा वापर रुग्णानी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

inject remedicine for injection,MP Amol Kolhe’s appeal to the citizens; Alternative medicine was also suggested to the citizens

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात