सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न – गृहमंत्री


आज महागाई वाढत आहे. इंधनाचे दर वाढत आहेत. बेरोजगारीच प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करून समाजा-समाजात अंतर निर्माण करायचे, लहान मोठा विषय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलने करायची आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत, अशी खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे-आज महागाई वाढत आहे. इंधनाचे दर वाढत आहेत. बेरोजगारीच प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करून समाजा-समाजात अंतर निर्माण करायचे, लहान मोठा विषय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलने करायची आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत, अशी खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. In Maharashtra majour civic problem facing people but some opposition party busy in regional politics says home minister Dilip Walse patil

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे मॅक्सनोव्हा हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात सध्या विविध महत्वाचे प्रश्न आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र संवेदनशील विषयावर बोलून वाद निर्माण करण्याचे काही जणांचे प्रयत्न आहेत. सरकारला अडचणीत आणण्याचेच हे प्रकार आहेत. विकासावर बोलायचे सोडून मशिदीवरील अजानवर बोलायचे. अजानाचा भाेंगा आहे म्हणून हनुमान चालिसा लावू हा काही विकासाचा मुद्दा हाेऊ शकत नाही. हनुमान चालिसावर बोलायचे आणि धर्माधर्मात, दोन वर्गात वाद निर्माण करून राजकारण अस्थिर करायचे काम सुरू आहे.



दुसऱ्या राज्यात घडलेल्या घटनांचे माेर्चे रीज्यात काढले जातात त्यावेळी राजकारणाचा दर्जा घसरलेला दिसत आहे. पण यातून राजकारण अस्थिर होणार नाही, तर देश खिळखिळा होवून देशाचे तुकडे यातून पडू शकतात. प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे. अजानचे भाेंगे लावायचे आहे त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावयाची आहे, त्यांनीही जरुर ती लावावी परंतु तिकडे हाेते त्याचवेळी ती लावू हे भूमिका याेग्य नाही.

पुढे ते म्हणाले, आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तशी कधीही नव्हती. आजपर्यंत देशात अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु आज ज्यापध्दतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर ज्या पध्दतीने केला जात आहे तसा यापूर्वी कधी काेणी केला नव्हता. महाराष्ट्राचे राजकारण प्रगल्भ हाेते. विकासाच्या मुद्यावर सर्वजण एकत्र येऊन कामे झाली आहे. परंतु आज फक्त विराेधात बाेला आणि कारवाई करु असे सुरु आहे. राज्यात पाेलीस यंत्रणा असतानाही केंद्रीय तपास यंत्रणा पाेलीस देखील केंद्रातून घेऊन येत असतील तर राज्याच्या व्यवस्थेवरील केंद्र सरकारचा विश्वास किती आहे हे सिध्द हाेते. मग त्यातून षडयंत्र करत राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.

In Maharashtra majour civic problem facing people but some opposition party busy in regional

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात