महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड : नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीला


वृत्तसंस्था

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी हे ‘मनसे’चे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. Biggest political developments in Maharashtra: Nitin Gadkari to meet Raj Thackeray

अर्थात ही भेट राजकीय आहे की वैयक्तिक हे स्पष्ट नाही. पण या भेटीने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. आताची ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड आहे.‘मनसे’ प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला सॉफ्ट कॉर्नर देत महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. अशातच भाजपचे नेते नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आणि ‘मनसे’ युतीची ही चर्चा सुरू आहे.

Biggest political developments in Maharashtra: Nitin Gadkari to meet Raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था