अफगाणिस्तानात अफूवर बंदी : तालिबानचे नवे फर्मान- अफूची लागवड आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर बंदी, उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा


तालिबान सरकारने रविवारी अफूच्या लागवडीवर बंदी घालणारा नवा हुकूम जारी केला. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने अफूची शेती आणि अमली पदार्थांच्या तस Afghanistan bans opium New Taliban decree bans opium cultivation and drug trafficking, severe punishment for violations


वृत्तसंस्था

काबूल : तालिबान सरकारने रविवारी अफूच्या लागवडीवर बंदी घालणारा नवा हुकूम जारी केला. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने अफूची शेती आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश जारी केला.

तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये दारू, हेरॉइनच्या गोळ्या, अफू आणि चरस यांसारख्या अमली पदार्थांच्या वापरावर, व्यापार आणि आयात निर्यातीवर बंदी आहे. या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर खटला भरून शिक्षा होईल.



अफगाणिस्तानात जगातील 80% अफूचे उत्पादन

जगातील एकूण अफू उत्पादनापैकी 80% एकट्या अफगाणिस्तानात होते. युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम (UNODC) नुसार, अफगाणिस्तानमध्ये 2017 मध्ये 9,900 टन अफूचे उत्पादन झाले. त्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना सुमारे 10 हजार कोटी रुपये मिळाले. हे देशाच्या GDP च्या 7% होते.

तालिबानची स्वतःची अफूपासून कोट्यवधींची कमाई

तालिबानचा हा निर्णय आश्चर्यकारक आहे, कारण त्यांच्या 80,000 लढवय्यांना अंमली पदार्थांच्या व्यापारातून निधी दिला जातो. नाटोच्या अहवालानुसार 2020 मध्ये तालिबानने ड्रग्जमधून 11 हजार कोटींची कमाई केली. 2001 मध्ये अफूचे उत्पादन 180 टन होते, ते 2007 मध्ये 8,000 टन झाले.

अफगाणिस्तानमध्ये पिकते सर्वाधिक मादक अफू

अफगाणिस्तानमध्ये जगातील सर्वाधिक मादक अफू पिकतो. हा अफू मूळ अफूपेक्षा 1500 पट अधिक नशा देणारा हेरॉईन, प्रक्रिया केलेल्या ड्रग्जच्या स्वरूपात जगभर पोहोचते. कंधार हा देशातील प्रमुख अफू उत्पादक प्रांतांपैकी एक आहे. येथील स्थानिक अर्थव्यवस्थेत अफूचा मोठा वाटा आहे.

Afghanistan bans opium New Taliban decree bans opium cultivation and drug trafficking, severe punishment for violations

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात