Raj Thackeray : हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना राज ठाकरेंचे भाषण झोंबले; नारायण राणे यांचे टोले


प्रतिनिधी

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याच्या मेळाव्याचे भाषण महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून गेले आहे. तब्बल दोन वर्षांनी राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात बोलले त्यानंतर त्यांना हिणवणाऱ्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे यांचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले.Raj Thackeray: Raj Thackeray’s speech insulted those who betrayed Hindutva; Narayan Rane’s team

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची स्तुती केली आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत नारायण राणे यांनी राज ठाकरे यांचे भाषण कोणाला टोचले आणि का टोचले याची थोडक्यात आणि अशोक मीमांसा केली आहे.



आपल्या ट्विटमध्ये नारायण राणे म्हणतात :

  •  पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे.
  • ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी आहे.
  •  गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीयुत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

Raj Thackeray: Raj Thackeray’s speech insulted those who betrayed Hindutva; Narayan Rane’s team

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात