अफगाणिस्तानात १८ हजार शिक्षकांना चार महिने तर डॉक्टरांना १४ महिने पगारच नाही


विशेष प्रतिनिधी

काबूल – अफगाणिस्तानमधील किमान १८ हजार शिक्षकांचे चार महिन्यांचे वेतन थकले आहे. यातील दहा हजार महिला आहेत. भयंकर आर्थिक समस्या निर्माण झाल्या असल्याने ते लवकरात लवकर मिळावे अशी मागणी या शिक्षकांनी तालिबानकडे केली आहे.No salary for teachers in Afghanistan

पश्चिमेकडील हेरत या प्रांतातील शेकडो शिक्षकांनी एकत्र येऊन आवाज उठविला. स्थानिक प्रसार माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. त्यानुसार अनेक शिक्षकांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. मुलांना अन्न देणे आणि त्यांची वैद्यकीय निगा राखणे त्यांना अशक्य झाले आहे.



गेल्या आठवड्यात समांगन आणि नुरीस्तान या प्रांतांमधील शेकडो डॉक्टर एकत्र आले होते. त्यांनी काबूलमधील संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेच्या इमारतीसमोर निदर्शने केली. युनायटेड नेशन्स असिस्टन्स मिशन इन अफगाणिस्तान या संस्थेच्या कार्यालयापाशी ते जमले होते. गेले १४ महिने वेतन मिळाले नसून जागतिक बँकेने ते द्यावे असे साकडे त्यांनी घातले होते.

No salary for teachers in Afghanistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात