गँग साेबत राहत नसल्याने तरुणाला बेदम मारहाण ; व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल


सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर परिसरात गुंड हातात कोयते घेऊन दहशत माजवतानाचे व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल होताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत गुन्हेगारांची धरपकड सुरु केली. One youth beaten by gang in sakharnagar area they make video shooting and viral on social media


विशेष प्रतिनिधी

पुणे : सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर परिसरात गुंड हातात कोयते घेऊन दहशत माजवतानाचे व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल होताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत गुन्हेगारांची धरपकड सुरु केली.बालाजीनगर धनकवडी परिसरात रजनी कॉर्नर येथे गँग साेबत राहत नसल्याने तसेच फुकट भाजी दिली नाही म्हणून गुंडांनी संबंधित तरुणाला बेदम मारहाण केली असून पाया पडायला लावले.तसेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या असून त्याचे फुटेज व्हायरल झाले आहेत.

याप्रकरणी सहकारनगर पाेलीस ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, साैरभ भगत (२३), संदीप शेंडकर (२३), अफान शेख (२०), सुफीयान (१९) व इतर पाच ते सहाजणां विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, व्हिडिओमध्ये एका अल्पवयीन मुलाला पाया पडायला लावणे , कोयते घेऊन परिसरात फिरणे, महिलांची छेड काढणे अशा प्रकारचे गुन्हे करतानो काही गुडांचे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. काही वृत्तवाहिण्यांवर ते झळकताच पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली.पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत सहकारनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
तक्रारदार तरुणाच्या ओळखीचे सदर आराेपी आसून ताे रस्त्याने पायी चालत जात असताना, तीन माेटारसायकलवर आराेपी त्याच्याजवळ आले व जबरदस्तीने त्याला माेटारसायकलवर बसून घेऊन गेले.

त्यानंतर त्यास शिवीगाळ व हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना, अल्पवयीन मुलाने मारहाण का करता आहे अशी विचारणा केली असता, आराेपींनी ‘तु यापूर्वी आमचे गँग साेबत राहत हाेता पण तु आता आमचे बराेबर का राहत नाहीस?’ असे म्हणुन लाकडी दांडक्याने त्याचे पाठीत मारुन त्यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करुन गुडघ्यावर बसवून त्याचा गळा दाबून मारहाण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार आराेपींनी माेबाईल मध्ये व्हिडिओ शुटिंग करुन सर्व आराेपींनी आरडाओरड करुन हातातील काेयते, पालघन व लाकडी दांडके दाखवत दहशत निर्माण करुन सदरचा व्हिडिओ साेशल मिडियावर व्हायरल केला आहे.

यासंदर्भात परिसरातील नागरिकांशी संवाद साधला असता, आम्ही वारंवार तक्रारी करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. यामुळे गुन्हेगारांचा आत्मविश्‍वास बळावला आहे. पोलिसांनीही सर्व प्रकाराची माहिती आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या गुंडांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या साथीदारांचा ठावठिकाणा शोधला जात आहे. या टोळीतील काही गुंडांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित असून त्याचीही कार्यवाही देखील सुरू आहे .

One youth beaten by gang in sakharnagar area they make video shooting and viral on social media

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*