खडकवासला धरणात बुडून तरूणाचा मृत्यू


खडकवासला धरणाता बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगेश नवनाथ नवले (वय १८, रा. बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. In khadakwasla dam one youth dead


विशेष, प्रतिनिधी

पुणे -खडकवासला धरणात बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. योगेश नवनाथ नवले (वय १८, रा. बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

नवले मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राशीनचा आहे. तो रविवार पेठेतील एका दुकानात कामाला होता. सुट्टी असल्याने तो मित्रांबरोबर खडकवासला धरण परिसरात फिरायला आला होता. योगेश आणि त्याच्या बरोबर असलेले चार मित्र दुपारी धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मित्रांबरोबर तो पोहला. काही वेळानंतर योगेश आणि मित्र काठावर आले. चेष्टामस्करीत त्याच्या मित्रांनी योगेशच्या अंगाला माती लावली. त्यानंतर योगेश पुन्हा पाण्यात उतरला.



पाण्यातून योगेश बाहेर आला नाही. तो पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. या भागात वाहतुकीचे नियोजन करणारे वाहतूक पोलिस हवालदार विलास वांबळे, शिपाई मकसूद सय्यद, गृहरक्षक दलाचे जवान शांताराम राठोड, प्रवीण घुले, विजय भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. हवेली पाेलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहिम राबवून योगेशला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

In khadakwasla dam one youth dead

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात