Sri Lanka: पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याचे वृत्त खोटे, देशाच्या पीएमओने फेटाळले, म्हणाले- अशी कोणतीही शक्यता नाही


श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. देशाच्या पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी अशा बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.Sri Lanka PM Mahinda Rajapaksa’s resignation is false, denied by PMO, says no possibility


वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. देशाच्या पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी अशा बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.

पीएमओने सांगितले की, सध्या अशी कोणतीही योजना नाही. श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. कर्जाच्या सापळ्यात अडकल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे श्रीलंकेत अन्न, इंधन, वीज आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. आर्थिक मदतीसाठी देशाने मित्र देशांची मदत घेतली आहे.दरम्यान, चीनच्या कर्जाखाली संपूर्ण दबून गेलेली श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी असताना आणि तेथे सर्वसामान्य जनतेची अन्नान्नदशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर “नेबर फर्स्ट” या धोरणानुसार भारताने श्रीलंकेला भरघोस मदत केली आहे. जानेवारी 2022 पासून मार्च 2022 अखेरपर्यंत अवघ्या 3 महिन्यांमध्ये भारताने श्रीलंकेला केलेली मदत अडीच अब्ज डॉलरच्या पुढे पोहोचली आहे, अशी माहिती भारताचे श्रीलंकेतील राजदूत गोपाळ बागले यांनी दिली आहे.

श्रीलंका चीनच्या कर्जाच्या बोजाखाली एवढी दबली आहे की देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. जनतेच्या जगण्याच्या सर्वसामान्य वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेतच पण अनेक ठिकाणी प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. श्रीलंकेत अन्नासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. आर्थिक परिस्थिती हाताळणे तिथल्या सरकारच्या क्षमते बाहेर पोहोचले आहे.

या पार्श्वभूमीवर भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून श्रीलंकेला अन्न औषधे आणि आर्थिक मदत केली आहे. ही सर्व प्रकारची मदत मिळून गेल्या 3 महिन्यांमध्ये अडीच अब्ज डॉलरपेक्षा अधिक मदत श्रीलंकेला करण्यात आल्याची माहिती गोपाळ बागले यांनी दिली आहे.

Sri Lanka PM Mahinda Rajapaksa’s resignation is false, denied by PMO, says no possibility

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती