हनी ट्रॅपचा बळी! फेसबूकवरील तरुणीच्या ब्लॅकमेलला कंटाळून कोल्हापूरातील तरुणाने केली आत्महत्या


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका तरुणाने फेसबुकवरील महिलेच्या ब्लॅकमेलला कंटाळून आत्महत्या केली. फेसबुकवर हरियाणा राज्यातील एका महिलेच्या संपर्कात आल्यानंतर तो या ट्रॅप मध्ये अडकला. या तरुणाचे नाव संतोष मनोहर निकम असे आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून त्याला ब्लॅकमेल होत असे.

In a honey trap on Facebook, a young man in kolhapur commits suicide

ही महिला त्याच्या संपर्कात फेसबुकच्या माध्यमातून आली. नंतर हळूहळू त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यातूनच अश्लील बोलणे व व्हिडिओ कॉलिंग इत्यादी माध्यमातून संपर्क वाढला आणि या हरियाणातील तरुणीने संतोषला काही अश्लील प्रकार करण्यास भाग पाडले व हे व्हिडिओ वायरल करण्याच्या धमक्या देऊन त्याच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. या सर्व ब्लॅकमेलच्या प्रकारांना कंटाळून संतोषने दोन दिवसांपूर्वी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.


Honey Trap : भारतीय लष्कराचे गुप्त दस्तऐवज पाकिस्तानी महिला एजंटला पुरवले, टपाल सेवा अधिकाऱ्याला अटक


याबाबत इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हनी ट्रॅपचा हा पहिलाच प्रकार आहे असे समजते. तसेच अनेक निनावी पत्राद्वारे पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले की याबाबत तरुणांनी समोर येऊन तक्रार करणे आवश्यक आहे.

In a honey trap on Facebook, a young man in kolhapur commits suicide

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण