Pandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका

Pandora Paper Leak financial secrets of rich and powerful exposed, sachin tendulkar anil ambani name in list of 300 indian

Pandora Paper Leak : जवळजवळ 5 वर्षांपूर्वी झालेल्या पनामा पेपर्स लीकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे पनामा पेपर्स लीकमध्ये आली होती. त्यावेळी हे उघड झाले होते की, कसे मोठे श्रीमंत व्यापारी, सेलिब्रिटींनी कर चुकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, पण आता पुन्हा एकदा हाच खुलासा संपूर्ण जगात झाला आहे आणि यावेळी या लीकचे नाव ‘पेंडोरा पेपर’ लीक’ आहे, यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे, तसेच भारतातील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेले उद्योजक अनिल अंबानींचे नावही या पेपर लीकमध्ये समोर आले आहे. Pandora Paper Leak financial secrets of rich and powerful exposed, sachin tendulkar anil ambani name in list of 300 indian


प्रतिनिधी

नवी दिल्ली : जवळजवळ 5 वर्षांपूर्वी झालेल्या पनामा पेपर्स लीकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे पनामा पेपर्स लीकमध्ये आली होती. त्यावेळी हे उघड झाले होते की, कसे मोठे श्रीमंत व्यापारी, सेलिब्रिटींनी कर चुकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या, पण आता पुन्हा एकदा हाच खुलासा संपूर्ण जगात झाला आहे आणि यावेळी या लीकचे नाव ‘पेंडोरा पेपर’ लीक’ आहे, यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे, तसेच भारतातील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेले उद्योजक अनिल अंबानींचे नावही या पेपर लीकमध्ये समोर आले आहे.

पँडोरा पेपर लीक म्हणजे काय?

जगभरातील तब्बल 12 दशलक्ष (1.20 कोटी) कागदपत्रे दिवसरात्र तपासल्यावर जगभरातील पैशांचे व्यवहार आणि गैरव्यवहार याबद्दल मोठा खुलासा पँडोरा पेपर लीकच्या माध्यमातून होतो. ही एक अशी लीक आहे, जी जगातील काही श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांनी लपवलेली संपत्ती, कर चुकवण्याच्या पद्धती, मनी लाँड्रिंग यांचा भंडाफोड करते. 117 देशांतील 600 हून अधिक पत्रकार आणि 140 माध्यम संस्थांनी अनेक महिने सतत काम केले आणि 14 वेगवेगळ्या स्रोतांकडून कागदपत्रे शोधताना सर्व खुलासे केले. हा खुलासा इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्सने केला आहे, जो जगातील सर्वात मोठा खुलासा असल्याचे मानले जाते. पँडोरा पेपर्स लीकमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या अनेक नेत्यांसह जगातील अनेक देशांच्या बड्या व्यक्तींची नावेही समाविष्ट आहेत. या लीकमध्ये भारतातील सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचेही नाव आहे.

कोणता खुलासा झाला?

‘पँडोरा पेपर लीक’ तपासाचे नेतृत्व ‘बीबीसी’ आणि ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने केले. बीबीसीच्या वृत्तानुसार, पँडोरा पेपर्स लीकमध्ये 64 लाख दस्तऐवज, सुमारे 30 लाख फोटो, 10 लाखांहून जास्त ईमेल आणि सुमारे 5 लाख स्प्रेडशीट समाविष्ट आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने एका वृत्तात म्हटले आहे की, भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अनिल अंबानी, ज्यांनी यूकेच्या न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केले आहे, त्यांच्या परदेशात 18 कंपन्या आहेत.

90 देशांतील 330 मोठ्या नेत्यांची नावे

‘पँडोरा पेपर लीक’च्या फायलींवरून हे स्पष्ट होते की, जगातील काही सर्वात शक्तिशाली लोक- 90 देशांतील 330 हून अधिक राजकारण्यांसह – त्यांची संपत्ती लपवण्यासाठी गुप्त कंपन्यांचा वापर कसा करतात. ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी या अमेरिकन थिंक-टँकचे लक्ष्मी कुमार म्हणाले की, हे लोक बर्‍याचदा निनावी सेल कंपन्यांच्या वापराद्वारे पैसे फनेल आणि सायफन करण्यास सक्षम होतात.”

‘पँडोरा पेपर लीक’मध्ये सचिनचे नाव

भारतातील अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांची नावे ‘पँडोरा पेपर लीक’मध्ये आहेत, ज्यात पंजाब नॅशनल बँकेकडून हजारो कोटींचा घोटाळा करून परदेशात पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांचाही पर्दाफाश झाला आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, नीरव मोदीच्या बहिणीने फरार होण्याच्या सुमारे एक महिन्यापूर्वी ट्रस्ट बनवून पैशांचा गैरवापर केला होता. पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी सावधपणे त्यांच्या संपत्तीची ‘पुनर्रचना’ करण्यास सुरुवात केल्याचे अहवालात उघड झाले आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारतातील दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर तीन महिन्यांनी व्हर्जिन आयलंडमधील आपली मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला.

यादीत 300 भारतीयांची नावे

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, पँडोरा पेपर्स लीकमध्ये भारताच्या 300 हून अधिक मोठ्या व्यक्तींची नावे आहेत, त्यापैकी केवळ 60 सेलिब्रिटीविरुद्ध पुरावे सापडले आहेत. ‘पँडोरा पेपर्स’ लीक करणाऱ्या संघटनेचे म्हणणे आहे की, हळूहळू पुराव्यांसह नावे उघड केली जातील. असे म्हटले जाते की या लोकांनी कर टाळण्यासाठी विविध बेकायदेशीर कृत्ये केली आहेत, ज्यात सामोआ, बेलीज, कुक आयलँड, तसेच ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि पनामा येथे टॅक्स हेव्हन तयार करणे समाविष्ट आहे.

कर चोरी भारताच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे

आयसीआयजेच्या ‘पँडोरा पेपर्स लीक’ संस्थेनुसार, जगभरातील श्रीमंत व्यापारी, राजकारणी आणि सेलिब्रिटींनी किती पैसे लाटले हे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु आयसीआयजेचा अंदाज आहे की, जगभरात सुमारे $5.6 ट्रिलियन ते $ 32 ट्रिलियनपर्यंत बेनामी कंपनी म्हणून परदेशात जमा करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) म्हटले की, या लोकांकडून टॅक्स हेव्हनच्या वापरामुळे जगभरातील सरकारांचे दरवर्षी सुमारे 600 अब्ज डॉलरचे नुकसान होते. तज्ज्ञ म्हणाले की, हे देश आणि समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्याचा थेट परिणाम देशातील लोकांच्या जीवनावर होतो. त्याचा मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर, विकासाच्या योजनांवर परिणाम होतो.

जगातील बड्या नेत्यांची नावे

सध्या भारतात दोन नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे अनिल अंबानी. पण याशिवाय जगातील अनेक बड्या नेत्यांची नावे पँडोरा पेपर लीकमध्ये येत आहेत. जॉर्डनचा राजा, युक्रेन, केनिया, इक्वेडोरचे अध्यक्ष आणि झेक प्रजासत्ताकाच्या पंतप्रधानांची नावे समाविष्ट आहेत. याशिवाय, माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचेही नाव पँडोरा पेपर लीकमध्ये समोर आले आहे. याव्यतिरिक्त, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या अगदी जवळच्या सहायकाचे नावदेखील यात समाविष्ट आहे. याशिवाय रशिया, अमेरिका, मेक्सिकोच्या सुमारे 130 अब्जाधीशांची नावे यात समाविष्ट आहेत. त्याचबरोबर भारताच्या शेजारी देश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्यांच्या अनेक मंत्र्यांची नावेही यात आली आहेत. पाकिस्तानच्या अनेक विरोधी नेत्यांची नावेही पँडोरा पेपर लीकमध्ये समाविष्ट आहेत.

Pandora Paper Leak financial secrets of rich and powerful exposed, sachin tendulkar anil ambani name in list of 300 indian

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात