वाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण? फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय; निवडणूक लढवण्याची तयारी

Know Who Is Ashish Mishra Son Of Union State Home Minister Ajay Mishra Teni Read in Details

Know Who Is Ashish Mishra : लखीमपूर खीरी येथील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कारने त्यांना चिरडल्याचा आरोप केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा ‘मोनू’वर आहे. आशिष मिश्रा हा मंत्र्यांचा धाकटा मुलगा आहे. जे आशिषला ओळखतात ते म्हणतात की, अगदी सुरुवातीपासूनच आशिषने वडिलांसोबत राजकारणास सुरुवात केली. त्याचबरोबर त्याने वडिलांचा व्यवसायही सांभाळायला सुरुवात केली. आशिष वडिलोपार्जित मालमत्तेतील पेट्रोल पंप, राईस मिलचीही देखरेख करतो. Know Who Is Ashish Mishra Son Of Union State Home Minister Ajay Mishra Teni Read in Details


प्रतिनिधी

लखनऊ : लखीमपूर खीरी येथील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कारने त्यांना चिरडल्याचा आरोप केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा ‘मोनू’वर आहे. आशिष मिश्रा हा मंत्र्यांचा धाकटा मुलगा आहे. जे आशिषला ओळखतात ते म्हणतात की, अगदी सुरुवातीपासूनच आशिषने वडिलांसोबत राजकारणास सुरुवात केली. त्याचबरोबर त्याने वडिलांचा व्यवसायही सांभाळायला सुरुवात केली. आशिष वडिलोपार्जित मालमत्तेतील पेट्रोल पंप, राईस मिलचीही देखरेख करतो.

2012 पासून राजकारणात सक्रिय

जिल्हा पंचायत सदस्यापासून राजकारण सुरू करणाऱ्या अजय मिश्रा टेनी यांना 2012 मध्ये निघासन विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून तिकीट मिळाले. यानंतर त्यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा मुलगा आशिषने घेतली. तेव्हा निघासन सीटवर सपाची लाट असतानाही भाजपचा विजय झाला. अजय मिश्रा टेनी यांनी येथे जोरदार विजय नोंदवला होता. वडील आमदार झाल्यावर मुलाचीही राजकारणात सक्रियता वाढली.

2017 मध्ये आशिष मिश्रांना लढवायची होती निवडणूक

2012 मध्ये विजयी झालेल्या अजय मिश्रा यांच्यावर विश्वास व्यक्त करत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लखीमपूरमधून तिकीट दिले. पुन्हा एकदा आशिष सक्रिय झाला आणि त्याच्या वडिलांना संसदेत पोहोचवले. दोन निवडणुकांचा अनुभव मिळाल्याने आशिष परिपक्व झाला होता. 2017च्या विधानसभा निवडणुकीत अजय मिश्रा यांनीही आपल्या मुलासाठी तिकीट मागितले, पण तेव्हा मिळाले नाही. मात्र, तिकीट न मिळूनही ते निगासन मतदारसंघात सक्रिय राहिले.

2022 चा संभाव्य उमेदवार

आशिष मिश्राा यांना 2017 मध्ये तिकीट मिळाले नाही. पण 2019 मध्ये अजय मिश्रा टेनी यांना पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट मिळाले. त्यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला. जुलै महिन्यातच भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. त्यांना गृह राज्यमंत्री करण्यात आले.

खरेतर केंद्रीय नेतृत्वाला सेंट्रल यूपीमध्ये स्वच्छ चारित्र्याच्या ब्राह्मण चेहऱ्याची गरज होती. ज्यासाठी अजय मिश्रा योग्य असल्याचे सिद्ध झाले. अजय मिश्रा मंत्री झाल्यावर 2022 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मुलगा आशिष निघासन विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार होण्याची शक्यता वाढली होती.

मुलावरील आरोपांवर मंत्री मिश्रा काय म्हणाले?

हिंसाचारानंतर अजय मिश्रा टेनी त्यांच्या लखीमपूर शहरातील निवासस्थानी पोहोचले आणि म्हणाले की, काही लोक माझ्या मुलावर आरोप करत आहेत. मी किंवा माझा मुलगा तिथे नव्हतो. माझा मुलगा आशिष गावात दंगल कार्यक्रमात होता. प्रशासकीय अधिकारीही त्या कार्यक्रमात राहतात. छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीदेखील आहे.

Know Who Is Ashish Mishra Son Of Union State Home Minister Ajay Mishra Teni Read in Details

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात