मुंबईत उष्णतेची लाट; चटके आणि घामाने मुंबईकर डबडबले; ३६ ते ४० तापमानाची नोंद


वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईकर उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून, बुधवारपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेने कहर केल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय होईल? या विचारानेच मुंबईकरांना घाम फुटला आहे. Heat wave in Mumbai; Temperatures of 36 to 40 degrees Celsius were recorded in most places

सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईवर सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. मुंबईकर घामाने डबडबले आहेत. मुंबई महानगर प्रदेशात रविवारी बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.



हवामान कसे राहणार

१४ ते १७ मार्चदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले आहे.

Heat wave in Mumbai; Temperatures of 36 to 40 degrees Celsius were recorded in most places

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात