कोरोनाचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनविणाऱ्या टोळीचा पुण्यात भांडाफोड ; दोघांना अटक


वृत्तसंस्था

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडमधून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील चार जणांच्या टोळीचे गैरकृत्याचे भांडे फुटले आहे. त्या पैकी दोघे पळून गेले आहेत.Corona’s fake negative report gang busted in Pune; Both arrested

आरोपीकडून २८ कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट जप्त केले आहेत. याप्रकरणी दोन जण पळून गेले आहेत. पत्ताराम केसारामजी देवासी आणि राकेशकुमार बस्तीराम वैष्णव यांना अटक झाली. त्यांच्या इतर दोन साथीदारांचा शोध हिंजवडी पोलिस घेत आहेत.



पुण्यातून राजस्थानला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दिला गेला, अशी माहिती पोलिस अधिकारी काटे यांना मिळाली. दोन्ही आरोपी केवळ ५००- ६०० रुपयांमध्ये रिपोर्ट देत असत. रिपोर्ट हे बावधन येथील लाईफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड येथील असून,

त्यांच्या निगेटिव्ह रिपोर्टवरूनच आरोपी इतर डॉक्टरांच्या बनावट सह्या करून रिपोर्ट बनवत असत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बनावट निगेटिव्ह २८ रिपोर्ट पोलिसांनी जप्त केले आहेत.

Corona’s fake negative report gang busted in Pune; Both arrested

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात