प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी बूस्टर सभा घेतली होती. त्यालाच आता प्रत्युत्तर देताना, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार फटेकबाजी केली आहे. Booster dose belongs to others but master blaster dose belongs to Uddhav Thackeray
महाराष्ट्रातील देशातील वातावरण आणि वातावरणावर आलेले मळभ, धुकं, गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या भाषणाने दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचाच धनुष्य दिसेल. अर्थात हे राज्य आणि शिवसेना पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. शिवसेनाप्रमुखांची प्रेरणा आहे. काही लोक राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, बूस्टर डोस कोणाचा ते माहिती नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल, असे राऊत म्हणाले.
– सभेचे व्यासपीठ भव्य
आजच्या सभेचे व्यासपीठ पाहाल, तर इतके मोठे व्यासपीठ मुंबईत निर्माण झाले नव्हते. भव्य असे व्यासपीठ आहे. शिवसेना आणि गर्दी यांचे नाते आहे. समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, गर्दी आणावी लागत नाही. बाळासाहेबांचा विचार, राज्याचा विचार, विकासाचा विचार या विचाराचे लोहचुंबक आहे. त्यामुळे लोकं आपोआप जमतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्राला आणि देशाला आहे. या सभेतून प्रत्येत प्रश्नाचे उत्तर मिळेल, असे राऊत म्हणाले.
– करारा जबाब मिळणार
अडीच वर्षानंतर सभा होत आहे. संपूर्ण देश त्यांचे विचार ऐकू इच्छितो. ऐतिहासिक आणि क्रांतीकारी रॅली होईल. काही लोक राज्याची अशांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना उद्धव ठाकरे करारा जवाब देणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App