Delhi Mundka Fire : 27 जणांचा होरपळून मृत्यू; 2 कारखाना मालकांना अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मुंदका येथे आगची मोठी दुर्घटना घडली. या आगीत आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी जण आत अडकल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात 2 कारखाने मालकांना अटक केली असून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल केला आहे. Delhi Mundka Fire: 27 killed in Horpul; 2 factory owners arrested

पश्चिम दिल्ली परिसरातील काल एका इमारतीला संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीप्रकरणी कारखाना मालकांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या आगीची चौकशीची करण्यात येणार आहे. दिल्लीतील मुंदका येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफएसएलची टीम घटनास्थळी जाणार आहे. एफएसएल टीम आगीचे कारण शोधून काढेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना तातडीची दोन लाखाची मदत जाहीर केली आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एमसीडीच्या बुलडोझर कारवाईवर बोलावलेली सकाळी 11.00 ची आमदारांची बैठक रद्द केली आहे.

आदेश गुप्ता यांच्या घरावरील आजचे आंदोलनही आम आदमी पक्षाने रद्द केले. मुंडका आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

इमारतीत अग्निसुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था नव्हती, अशी माहिती पुढे आली आहे. दिल्ली अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था पुरेशी नव्हती. या इमारतीला अग्निशमन विभागाने एनओसीही दिलेली नाही. ही आग इतकी भीषण होती की यात अख्खी बिल्डिंगच आगीच्या विळख्यात सापडली आहे. आठ तासांहून अधिक वेळ ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. दरम्यान इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरूण गोयल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

– घटनाक्रम

  • सकाळी मुंदक्याच्या इमारतीत सर्व काही सुरळीत सुरु होते. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोटिव्हेशनल क्लास सुरु होता.
  • 4.30 वाजता इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन धूर निघू लागला. त्यानंतर पहिल्या मजल्यावर आरडाओरडा सुरु होता.
  • आग लागल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि 10 मिनिटांनी पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले.
  • 4.50 वाजता इमारतीतून बाहेर पडण्यासाठी लोकांनी दोरीच्या साहाय्याने पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने अनेकांची सुटका केली.
  • सायंकाळी 5.00 च्या सुमारास एकामागून एक अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.
  • सायंकाळी 6.20 वाजता एका 45 वर्षाच्या महिलेचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला. आग विझवण्याचे काम सुरूच होते. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • रात्री 10.50 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली आणि कुलिंग ऑपरेशनला सुरुवात झाली. अग्निशमन दलाने एकूण 16 मृतदेह बाहेर काढल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.
  • ही संख्या हळूहळू वाढू लागली आणि 27 वर पोहोचली. पुन्हा एकदा 11.40 च्या सुमारास पहिल्या मजल्यावर ज्वाला दिसू लागल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. रात्री 12.00 वाजेपर्यंत कूलिंग कामासह शोध मोहीम सुरुच होती.

Delhi Mundka Fire: 27 killed in Horpul; 2 factory owners arrested

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात