उद्धवजी, अन्य राज्यांबद्दल बोलण्याऐवजी विशेष अधिवेशनात शक्ती कायदा संमत करा… विजया रहाटकरांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : “तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात; तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोला! महाराष्ट्राबददल कृती करा, येथील महिलांना सुरक्षा देण्यासाठी पावले उचला… दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतःची सुटका कशी करून घेता येईल?,” असा सवाल राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. BJP National Secretary Vijaya Rahatkar targets CM Thackeray over special session of Maharashtra legislative assembly

महिला अत्याचारांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसांची विशेष अधिवेशन बोलवा, अशी सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, विधिमंडळ अधिवेशन बोलवण्याऐवजी संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन बोलवा, अशी खोचक टिप्पणी करणारे पत्र राज्यपालांना लिहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर विजया रहाटकर यांनी फेसबुक पोस्टवरून मुख्यमंत्र्यांना जळजळीत सवाल केले आहेत.

“महिला अत्याचारांच्या घटनांबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा ही माननीय राज्यपालांची सूचना काय चुकीची आहे?”, असा सवाल करून त्या म्हणाल्या, “एकीकडे छत्रपती शिवरायांचे नाव घेता आणि दुसरीकडे महिला अत्याचारांबाबत एवढी असंवेदनशीलता? राज्य महिला आयोगाची नियुक्ती करत नाही, शक्ती कायदा फक्त कागदावर आहे, मंत्री आणि सत्तारूढ कार्यकर्ते महिला अत्याचारांबाबत “आघाडी”वर आहेत, साकीनाक्यासारख्या घटनेने राज्याची मान खाली गेली आहे… या सर्वांचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी तुम्ही इथे ही केंद्र सरकारकडे बोट दाखवता?”

“अन्य राज्यांत काही घटना घडत असतील तर त्या त्या राज्यांतील मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, माननीय राज्यपाल, तेथील न्याय व पोलीस यंत्रणा काय ते बघून घेतील.. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात; तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोला! महाराष्ट्राबददल कृती करा, येथील महिलांना सुरक्षा देण्यासाठी पावले उचला… दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतःची सुटका कशी करून घेता येईल?”, असे त्या म्हणाल्या.

BJP National Secretary Vijaya Rahatkar targets CM Thackeray over special session of Maharashtra legislative assembly

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात