हजारोंचे प्राण वाचविणाऱ्याला नेत्यालाच न्यायालायने दिली २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा


किगली : रवांडामध्ये 1994 मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात हजारो जणांचे प्राण वाचविल्याबद्दल जगभरात कौतुकास पात्र ठरलेले पॉल रुसेसाबगिना (वय ६७) यांना रवांडामधील न्यायालयाने 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. The leader who saved thousands of lives was sentenced by the court to 25 years in prison

येथील सरकारने त्यांच्यावर दहशतवादाचा आणि बेकायदा सशस्त्र गटांची स्थापना केल्याचा आरोप ठेवला होता. रवांडा सरकारने सूड म्हणून रुसेसाबगिना यांना अटक करून शिक्षा ठोठावल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला आहे. रुसेसाबगिना यांनीही, या सरकारकडून न्याय मिळण्याची अपेक्षा केलीच नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.



रवांडामध्ये वांशिक हिंसाचारात अल्पसंख्य तुत्सी लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल रुसेसाबगिना यांना अमेरिकेच्या अध्यक्षांचे विशेष पदक प्राप्त झाले होते. त्यांच्या या धाडसावरच आधारित असलेला ‘हॉटेल रवांडा’ हा चित्रपटही गाजला होता. या शिक्षेचे जागतिक राजकारणात विशेषतः आफ्रिका खंडात मोठा परिणाम उमटण्याची शक्यता आहे. रवांडा सरकारच्या या कृतीला या आधिच अनेक देशांनी विरोध केला आहे.

The leader who saved thousands of lives was sentenced by the court to 25 years in prison

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात