मोठे नेते – लहान नेते; शरद पवार – पंकजा मुंडे यांचे एकमेकांना टोले प्रतिटोले


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी काल आणि आज एकमेकांना टोले आणि प्रतिटोले दिले आहेत. Big leaders – small leaders; Sharad Pawar and Pankaja Munde clashed with each other

पंकजा मुंडे यांनी कोणतेही वक्तव्य केले तर त्यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत. त्यांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असा टोला शरद पवार यांनी काल पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना लगावला होता.

त्यावर आज पंकजा मुंडे यांची मुंबई विमानतळावर प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, की पवार साहेब खरंच बोललेत. मी मोठी नेता नाही. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांशी बोलायला हवे त्यांना शिकवायला हवे. मार्गदर्शन करायला हवे. हे मी शिकले आहे. शिवाय त्यांनी मला लहान म्हटले असले तरी मी लहान होणार नाही आणि मोठीही होणार नाही. माझा जो राजकीय साईज आहे तेवढाच राहील, असा प्रतिटोला पंकजा मुंडे यांनी लगावला.



पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात राज्य सरकारवर टीका केली होती. त्यासंदर्भात शरद पवारांना पिंपरी-चिंचवडच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर, आपण प्रतिक्रिया व्यक्त करावी एवढ्या पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या नाहीत, असे ते म्हणाले होते. त्याला पंकजा मुंडे यांनी मुंबई विमानतळावर प्रत्युत्तर देऊन त्या भाजपच्या राष्ट्रीय चिटणीसांच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाल्या.

Big leaders – small leaders; Sharad Pawar and Pankaja Munde clashed with each other

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात