औरंगाबाद: सत्तारांनी माझी जमीन हडपली-शासन-प्रशासन दखल घेईना ; सिल्लोडच्या आशा बोराडेंच केंद्र सरकारला न्यायासाठी ‘रक्तरंजित पत्र’


  • अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, त्यामुळे आमचं जीव उध्वस्त झालंय, असा आरोप करत सिल्लोडच्या महिलेने जुलै महिन्यात मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं होतं.

  • हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र अद्याप एफआयआर नोंद करण्यात आलेला नाही.

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, त्यामुळे आमचं जीव उध्वस्त झालंय, असा आरोप करत सिल्लोडच्या महिलेने मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं होतं. आशा बोराडे असं या महिलेचं नाव असून त्या सिल्लोड येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आता न्याय मिळावा यासाठी थेट स्वतःच्या रक्ताने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या प्रकारणात अद्याप एफआयआर नोंद करण्यात आलेला नाही. Aurangabad: Authorities grabbed my land – government-administration did not take notice; Sillod’s ‘Asha Boradench’ bloody letter to central government for justice

जुलै महिन्यात काय घडले?

औरंगाबाद सिल्लोड तालुक्यातील उंडणगावमधील आशाबाई बोराडे या महिलेने मंत्रालयाच्या गेट समोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता . या महिलेसोबत तिची मुलगी आणि सामाजिक कार्यकर्त्या विशाखा गायकवाड या देखील होत्या. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत तिघींनाही ताब्यात घेतलं होतं.



अब्दुल सत्तार यांनी माझी जमीन हडपली –

मंत्री अब्दुल सत्तार यांनी माझी जमीन बळकावल्याचा आरोप आशाबाई बोराडे या महिलेने केला आहे. शिवाय या जमिनीवर त्यांनी बेकायदेशीररित्या व नियमबाह्य पद्धतीने कॉलेजची इमारत उभारलेली आहे, असं देखील म्हटलंय. अब्दुल सत्तार यांच्या त्रासामुळे आमचं संपूर्ण जीवन उध्वस्त होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सदर महिला ही शेतकरी कुटुंबातून असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दबावामुळे तहसीलदारांनी सुद्धा महिलेच्या नावावर महसूल अभिलेखामध्ये फेरफार घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, असाही आरोप संबंधित महिलेने केला आहे. शासनाला निवेदन देऊन सुद्धा कुठलीही दखल न घेतल्याने आज मंत्रालयासमोर आंदोलन केलं, असं आशाबाई बोराडे यांनी सांगितलं.

काय आहे व्हायरल मॅसेज?

रक्तरंजित सत्य…..

उंडणगाव ता. सिल्लोड येथील महिला आशाबाई बोराडे यांची गट नंबर 336 मधील शेतजमीन अवैध कब्जा करून अब्दुल सत्तार यांची पत्नी अध्यक्षा असलेल्या आदर्श एज्युकेशन सोसायटी संस्थेमार्फत तिथे बेकायदेशीर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विज्ञान महाविद्यालयाचे अवैध बांधकाम करण्यात आले. प्रकरणी 5 जुलै 2021 रोजी मंत्रालयासमोर निर्वस्त्र आंदोलन करण्यासाठी आशाबाई गेली असता तिला तिथेच अटक करण्यात आली. महाराष्ट्र शासनासमोर न्याय मागून शेवटी कंटाळून, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात स्वतःच्या रक्ताने लिहिले दिल्ली ईडी ला तक्रारपत्र.
आता तरी या महिलेला न्याय मिळेल का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आपली सत्ता वाचण्यासाठी या मंत्र्याचा बचाव किती दिवस करणार…?? यासह त्यांचा रक्ताने पत्र लिहितानाचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.

Aurangabad : Authorities grabbed my land – government-administration did not take notice; Sillod’s ‘Asha Boradench’ bloody letter to central government for justice

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात