मुख्यमंत्री झाल्यावर उध्दव ठाकरे मंगळवारी प्रथमच दिल्लीला जाणार आहेत. मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता ही भेट होणार आहे.After becoming the Chief Minister, Uddhav Thackeray will go to Delhi for the first time and will meet the Prime Minister on Maratha reservation
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री झाल्यावर उध्दव ठाकरे मंगळवारी प्रथमच दिल्लीला जाणार आहेत. मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता ही भेट होणार आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील राहणार उपस्थित राहणार आहे. यावेळेस मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, तौक्ते चक्रीवादळ मदत याविषयी चर्चा होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर राज्यात संतापाचे वातावरण आहे. आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या हातात आहे असे महाविकास आघाडी सरकारकडून सांगण्यात येत आहे. दुसºया बाजुला राज्य सरकारने आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना गलथानपणा केला.
फेरविचार याचिकाही दाखल केली नाही असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकारही निर्णय घेऊ शकते, असे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. १६ जून रोजी कोल्हापुरात मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
राज्य सरकारने आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. समाजाचा उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी ही राजकीय नेत्यांवरच राहिल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App