पंढरीत दुमदुमणार पुन्हा विठुरायाचा गजर; रोज १० हजार भाविकांच्या मुखदर्शनाची सोय


  • कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे मात्र बंधनकारक

प्रतिनिधी

पंढरपूर : विठुरायाच्या पंढरीत त्याच्या भक्त भाविकांचा विठू नामाचा गजर पुन्हा एकदा होणार आहे. श्री विठ्ठल आणि रुख्मिणी मातेच्या कोट्यावधी भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेल्या भाविकांना आता डोळे भरून पाहता येणार आहे.Vithuraya’s alarm will ring again in the evening Facilitation of facelift of 10,000 devotees daily

७ ऑक्टोबर पासून दररोज दहा हजार भाविकांना विठुरायाचे मुखदर्शन घेता येणार आहे. मात्र, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी समितीने घेतली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. मंदिर समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.



राज्यातील सर्व मंदिरे ७ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील ठाकरे पवार सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी मंदिर समितीचे सदस्य डॉ दिनेश कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महारज जळगावकर, शकुंतला नडगिरे, माधवी निगडे, नगराध्यक्षा साधना भोसले, कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

सरकारचे कोरोना बाबतचे सर्व नियमांचे पालन करावे, वय वर्षे दहा वर्षाच्या आतील, ६५ वर्षापुढील, गर्भवती महिला यांनी दर्शनास येण्याचे टाळावे, अशी नियमावली लागू करण्याचे बैठकीत ठरले त्याचबरोबरदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे तापमान तपासले जाणार आहे.

तसेच दर्शन रांगेत भाविकांनी मास्क,योग्य अंतर, सॅनिटायझर आदी नियम बंधनकारक केले आहेत. तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क राहणार आहे. मंदिर भाविकांसाठी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खूले राहणार आहे. यात दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत स्थानिकांना, नवरात्रोसत्वात महिलांना याचा लाभ घेता येईल.

दि ७ ऑक्टोबरपासून दर्शनासाठी http://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून तारीख, वेळ निश्चित करता येईल. तसेच इथे आल्यावर मुख दर्शनाची रांग कासार घाट येथून सुरू होणार आहे. त्या ठिकाणाहून दर्शन घेता येईल.

तसेच मंदिरात दर्शनासाठी येताना हार, फुले, नारळ, प्रसाद घेवून जाण्यास बंदी केली आहे. मंदिर, दर्शन रांग वेळोवेळी फवारणी आणि स्वच्छ केले जाणार असल्याची माहिती गुरव यांनी दिली आहे. तसेच मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

देवाचे नित्योपचार सर्व ज्या त्या वेळेनुसार आणि परंपरेनुसार होणार आहेत. भाविकांनी संकेतस्थळावरून बुकींग करून, अथवा समक्ष येऊन दर्शनाला यावे. मात्र गर्दी करू नये. मंदिर समितीने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली आहे.

येणाऱ्या भाविकांनी देखील सरकारच्या नियमाचे पालन करावे. जर कोणाला काही त्रास झाल्यास मंदिर समितीला सांगावे त्वरित वैद्यकीय मदत केली जाईल. असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर यांनी सांगितले

Vithuraya’s alarm will ring again in the evening Facilitation of facelift of 10,000 devotees daily

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात