स्वातंत्र्य@75; उत्तर प्रदेशात 75 जिल्ह्यातील 75000 लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे प्रदान


वृत्तसंस्था

लखनौ : भारताच्या प्रगतीत आधुनिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतः बरोबर देशाच्या प्रगतीला चालना द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. Keep abreast of modern technology; Prime Minister Narendra Modi’s appeal to the people; Home keys provided to 75,000 people at the event in Lucknow

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यूपीतीला ४७३७ कोटींच्या ७५ प्रकल्पांचे आणि तीन दिवसीय राष्ट्रीय ‘न्यू अर्बन इंडिया कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन त्यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय-यू) घरांच्या चाव्या डिजिटल पद्धतीने उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमधील ७५ हजार लाभार्थींना दिल्या. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी उड्डाण मंत्री ह्ररदीप पुरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी पंतप्रधान आवास योजनेच्या कामाची माहिती दिली. गेल्या सात वर्षात देशात १ कोटी ३० हजार घरांचे निर्माण केले आहे. यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात केवळ १३ लाख घरे बांधण्यात आली होती. उत्तर प्रदेशात त्यावेळच्या सरकारच्या काळात १८ हजार घरांना मंजुरी देण्यात आली. पण, १८ देखील बांधली नव्हती. योगी सरकार सत्तेवर आल्यावर ९ लाख घरांची निर्मिती करण्यात आली. १४ लाख घरांचे बांधकाम सुरु आहे. विशेष म्हणजे या ९ लाख घरे गरीब लाभार्थींना देण्यात सुद्धा आली आहेत.

ते म्हणाले, देशातील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३५ कोटी लोकांपैकी ३ कोटी लोक हे लखपती बनले आहेत. कारण त्यांना पक्की घरे सरकारने बांधून दिली आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील लोकांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होते. त्यांना वीज,पाणी, गॅस आदी सुविधा देण्याचे महत्वाचे कार्य करण्यात आले आहे. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लोकांची बँक खाती काढण्यात आल्यामुळे डिजिटल पेमेंटला मोठी चालना मिळाली आहे. तब्बल ६ लाखांवर व्यवहार या माध्यमातून झाले आहेत.

सरकार देशाचा आठही बाजूने विकास करत आहे. शहरे कचरामुक्त करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, घरबांधणी, रेरा कायद्यामुळे व्यवहारात आलेला पारदर्शकपणा या व अशा वेगवेगळ्या प्रकलपामुळे जनतेचे जीवनमान अधिक सोपे करण्याचे सरकारचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. विविध प्रकल्पातून रोजगाराची नव्या संधी निर्माण होत आहेत.त्यात मेट्रो, बांधकाम आणि रस्त्याची निर्मितीचा समावेश आहे. गाव तेथे वीज हा उपक्रम सरकारने राबविला आहे. एलईडी लाइटचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे त्याचे उत्पादन वाढले. पूर्वी ३०० रुपयांना मिळणारा एलईडी दिवा आता ६० रुपयांत उपलब्ध होत आहे. तसेच या दिव्यांचा वापर वाढल्याने विजेचे बिलही कमी येण्यास आणि विजेची मोठी बचत होण्यास सुरुवात झाली आहे.

१८ लाख पणत्या आवास योजनेतील घरात तेवाव्यात

दिवाळीत अयोध्येत राम मंदिर परिसरात साडेसात लाख दिवे (पणत्या) एकाच वेळी तेवविल्या जाणार आहेत. आता त्याच दिवशी पंतप्रधान आवास योजनेत तयार केलेल्या ९ लाख घरात प्रत्येकी दोन पणत्या लावल्या तर एकूण १८ लाख पणत्या तेवतील आणि ही संख्या अयोध्येतील तेवणाऱ्या पणत्यांपेक्षा अधिक असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

Keep abreast of modern technology; Prime Minister Narendra Modi’s appeal to the people; Home keys provided to 75,000 people at the event in Lucknow

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण