पंजाबमध्ये कॉँग्रेसला ११७ पैकी १५ जागाही मिळणार नाहीत, कॅ. अमरिंदर सिंग सैनिक आहे, ते हरणार नाही, पत्नी परनीत कौर यांचा विश्वास


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाबमध्ये कॉग्रेसला आगामी निवडणुकीत ११७ पैकी १५ जागाही मिळणार नाही. कॅ.अमरिंदर सिंग हे सैनिक आहेत. ते हरणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या पत्नी खासदार परनीत कौर यांनी व्यक्त केला आहे.In Punjab, Congress will not get even 15 out of 117 seats. Amarinder Singh is a soldier, he will not lose, believes his wife Parneet Kaur

एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखीत परनीत कौर म्हणाल्या, अमरिंदर सिंग हे एक सैनिक आहेत त्यामुळे या युद्धामध्येही ते नक्कीच विजयी होतील. शेतकरी आंदोलन संपवण्यासंदर्भात अमरिंदर हे भाजपा सरकारमधील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच यासंदर्भाती, चांगली बातमी समोर येईल. शेतकरी आंदोलन हा आगामी काळामधील विधानसभा निवडणुकींमधील महत्वाचा मुद्दा राहणार आहे.



परनीत कौर म्हणाल्या, अमरिंदर सिंग हे सध्या कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करत आहेत. सध्या ते पंजाबच्या सुरक्षेसंदर्भातही चिंतेत आहे. 1998 साली पंजाबमध्ये काँग्रेसचा तेव्हा काहीच प्रभाव नव्हता त्या काळी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी काँग्रेसला राज्यात जनाधार मिळवून दिला.

2002 साली त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यात काँग्रेसचं सरकार आलं. 2017 साली पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला जात असतानाही अमरिंदर सिंग यांच्या पाठीशी पंजाबचे लोक उभे राहिले आणि काँग्रेसचा विक्रमी विजय मिळाला.

सध्या तरी मी काँग्रेसमध्ये आहे, असे सांगून परनीत कौर म्हणाल्या, पुढील गोष्टींबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वालाच ठाऊक असेल. मी खासदार असेपर्यंत पतियालामधील लोकांची सेवा करत राहील. काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत आहे. सध्या तरी मला पक्षासाठी चांगलं वातावरण आहे. अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसच्या कोणत्याही मोठ्या नेत्याचा फोन आला नव्हता.

In Punjab, Congress will not get even 15 out of 117 seats. Amarinder Singh is a soldier, he will not lose, believes his wife Parneet Kaur

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात