लखीमपूर घटनेवर शरद पवारांचीही तीव्र प्रतिक्रिया, म्हणाले- मोदी सरकारची नियत दिसली, यूपीत तर जलियानवाला बागसारखी परिस्थिती!’

NCP President Sharad Pawar Criticized PM Modi And CM Yogi Over Lakhimpur Kheeri Incident in Press Conference delhi

NCP President Sharad Pawar : अवघ्या देशात खळबळ उडवून देणाऱ्या यूपीतील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेवर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप आहे. याचेच तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यूपीतील घटनेबद्दल पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. NCP President Sharad Pawar Criticized PM Modi And CM Yogi Over Lakhimpur Kheeri Incident in Press Conference delhi


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अवघ्या देशात खळबळ उडवून देणाऱ्या यूपीतील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेवर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप आहे. याचेच तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यूपीतील घटनेबद्दल पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

यूपीतील परिस्थितीची तुलना जालियनवाला बागेतील हत्याकांडाशी करत पवारांनी पीएम मोदींच्या मौनावरही प्रश्न केले आहेत. ‘यूपीमध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला करण्यात आला, त्यातून भाजपची नियत दिसली आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

राजधानी दिल्लीतील पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, ‘लखीमपूर खेरी इथं शेतकरी शांततापूर्ण आंदोलन करत होते. सरकारकडं आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा हक्क बजावत होते. त्यांच्यावर सत्ताधारी भाजपशी संबंधित लोकांनी गाडी घालून त्यांना चिरडले. हा सरळसरळ शेतकऱ्यांवरचा हल्ला आहे. उत्तर प्रदेश व केंद्र सरकारनं याची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे.’

पुढे ते म्हणाले की, ‘लखीमपूर येथील घटनेचा केवळ निषेध करून समाधान होणार नाही. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची गरज आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातील निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी घोषणा केली आहे. मात्र, आम्हाला ते मंजूर नाही. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी शरद पवार यांनी केली.

उत्तर प्रदेशात इतका हिंसाचार होऊनही पंतप्रधान मोदी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही, याकडं पवारांचं लक्ष वेधलं असता ते म्हणाले, ‘ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर हल्ला झाला, त्यावरून केंद्र सरकारची नियत दिसली आहे. आज तुमच्याकडं सत्ता आहे म्हणून सत्तेचा गैरवापर करून तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. पण त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही एक दोन दिवस असं करू शकाल. पण फार काळ हे चालणार नाही. ह्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी तुम्हाला देईल.’

या घटनेबद्दल राष्ट्रपतींची भेट घेण्याचा विचार आहे का, याबाबत विचारलं असता ‘ही घटना अत्यंत गंभीर आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते करू. राष्ट्रपतींना भेटण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. सर्व विरोधी पक्षांना मिळून त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. तूर्त तरी याविषयी माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही,’ असं पवार म्हणाले.

NCP President Sharad Pawar Criticized PM Modi And CM Yogi Over Lakhimpur Kheeri Incident in Press Conference delhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात