शिवसेना फुटूनही मुंबईत शिरकावाची संधी काँग्रेसने गमावली; सांगलीची हक्काची जागाही उबाठाने पटकावली!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना फुटल्यानंतरही मुंबईसारख्या महानगरात पुन्हा राजकीय शिरकाव करण्याची संधी काँग्रेसने गमावली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभेची पहिली यादी बघितल्यावर याचे प्रत्यंतर येते. काँग्रेसला त्या पक्षाकडून मुंबईतली एकही जागा खेचून घेता आली नाही. त्याउलट काँग्रेसची सांगलीची हक्काची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खेचून घेतली. महाविकास आघाडीत काँग्रेस तोट्यात गेली. Uddhav thackeray pressurised Congress to surrender all Mumbai loksabha constituencies to shivsena

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपात जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये काँग्रेसने वायव्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागा मागितल्या होत्या. कारण एकेकाळी खरंच काँग्रेसचे मुंबईवर वर्चस्व होते, पण मोदी लाटेत हे वर्चस्व गमावल्यानंतर 10 वर्षांनी का होईना, पण काँग्रेसला पुन्हा एकदा आपल्या जुन्या जागांवर ताबा सांगण्याची संधी आली होती. तसा दावा मुंबईतल्या नेत्यांनी सांगितला देखील, पण काँग्रेस नेत्यांना खेचून घेण्यासाठी पुरेसा जोर लावता आला नाही. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा दावा हाणून पाडला आणि मुंबईतल्या चारही मतदारसंघातले आपले उमेदवार जाहीर केले.

त्याउलट सांगलीची काँग्रेसची हक्काची जागा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडे खेचून घेतली. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा अशी चर्चा होती. परंतु तो निर्णय मात्र अंतिम झालेला नव्हता. अंतिम निर्णय होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. चंद्रहार पाटलांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याची बक्षिसी त्यांना मिळाली.

कोल्हापुरात शाहू महाराजांसाठी शिवसेनेने आपली हक्काची जागा सोडली, पण शाहू महाराजांनी शिवसेनेच्या मशालीवर उभे राहण्यापेक्षा काँग्रेसच्या हाताच्या पंजावर उभे राहणे पसंत केले. त्यामुळे कोल्हापुरातले कॉम्बिनेशन उमेदवार पवारांच्या पसंतीचे, पण ते लढणार हाताच्या चिन्हावर आणि जागा मात्र पूर्वीची शिवसेनेची असे घडले आहे. त्या बदल्यात शिवसेनेने सांगलीची काँग्रेसची हक्काची जागा परस्पर आपल्याकडे खेचून घेत तिथे पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Uddhav thackeray pressurised Congress to surrender all Mumbai loksabha constituencies to shivsena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात