विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील तळजाई टेकडी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार चांगलेच भडकले. “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”Take it now and put it in my head “, Ajit Pawar got angry at the question in the press conference
असं उत्तर देत त्यांनी संभाजीराजेंच्या उपोषणावर बोलणं टाळलं. यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.अजित पवार यांनी सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात होत असलेल्या शिवीगाळीवरही भाष्य केले. अजित पवार म्हणाले, “मी कितीदा सांगितले की, दोघांनी तारतम्य ठेवले पाहिजे.
आमच्या बद्दल देखील काही वाचळवीर चालेल आहे ना, त्यावर मी अवाक्षर देखील बोललो का? आपलं काम भलं आणि आपण भलं. प्रत्येकाची कामाची पद्धत आहे. माझं आज पण आवाहन आहे की, दोन्ही बाजूने थांबलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही. ही आपली संस्कृती नाही. हे आपल्याला शोभणारं नाही.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App