किरीट सोमय्यांनी जाहीर केलेले डर्टी डझन कोण? शिवसेनेच्या पाच जणांनंतर अजित पवारांचा नंबर


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील डर्टी डझनची यादी प्रसिध्द केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेनेच्या पाच नेत्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा क्रमांक आहे.Who is the Dirty Dozen announced by Kirit Somaiya? Ajit Pawar’s number after Shiv Sena’s five

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. अनिल देशमुख- नवाब मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विचार करावा.



पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर? पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी आणि कोणाला आधी तुरुंगात पाठवायचं हे त्यांनीच ठरवावे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

ठाकरे सरकारमधले ‘डर्टी डझन’ कोण? याची यादीच सोमय्या यांनी जाहीर केली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते कितीवेळा असं आंदोलन करणार आहेत? मी आजच डर्डी डझनची यादी जाहीर केली. त्यांच्यावर आधीच तपास आणि कारवाई सुरू आहे. या डर्टी डझनमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक या दोघांबाबत निर्णय आला. त्यात अनिल परबही आहेत आणि त्यांच्यावर आधीच प्रक्रिया सुरू झाली आहे.

या यादीमध्ये अनिल परब, संजय राऊत, सुजित पाटकर, भावना गवळी, आनंद आडसुळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे.

Who is the Dirty Dozen announced by Kirit Somaiya? Ajit Pawar’s number after Shiv Sena’s five

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात