मुग्धा वैशंपांची होणाऱ्या नवऱ्यासाठी खास पोस्ट! माय मॅन म्हणत दिल्या वाढदिवसाच्या गोव्यातून शुभेच्छा!

विशेष प्रतिनिधी

पुणे : सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन प्रसिद्धीझोतात आले. संगीत क्षेत्रात दोघांनीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमापासून सुरु झालेली त्यांची मैत्री आजही कायम आहे. काही महिन्यांपूर्वी प्रथमेश-मुग्धाने ‘आमचं ठरलंय’ म्हणत सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. लवकरच ते दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.Special post for Mugdha Vaishampa’s future husband



मुग्धा वैशंपायनने प्रथमेश लघाटेच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो शेअर केला आहे. दोघेही एकत्र ‘मर्मबंधातील ठेव’ हा संगीत कार्यक्रम करतात. या कार्यक्रमानिमित्त सध्या ते गोव्यात आहेत. गुरुवारी ‘मर्मबंधातील ठेव’चा हरमाळ येथे प्रयोग झाला होता. याची खास झलक गायिकेने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर केली होती. त्यानंतर आज प्रथमेशच्या वाढदिवसानिमित्त तिने रोमॅंटिक फोटो शेअर करत होणाऱ्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय मॅन” असं कॅप्शन मुग्धाने प्रथमेशसह शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. मुग्धाने शेअर केलेला फोटो रिशेअर करत प्रथमेशने “थॅंक्यू मुग्गा…” असं म्हटलं आहे.

Special post for Mugdha Vaishampa’s future husband

महत्वाच्या बातम्या

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात