महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती!


शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती एसीसीकडून मंजूर करण्यात आली होती.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  फोन टॅपिंग प्रकरणात महाविकास आघाडीच्या सरकारने वादग्रस्त ठरविलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील मुंबई व पुण्यात दाखल असलेले सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द ठरवले.  शिवाय सायबर पोलसी ठाण्यातही त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास बंद करण्यात आला होता. त्यानंतर शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती एसीसीकडून मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार आता त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  Rashmi Shukla appointed as Director General of Police of Maharashtra

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ,  आमदार व तत्कालीन मंत्री  बच्चू कडू,  संजय काकडे, आशिष देशमुख  यांचे फोन टॅप केल्याचे रश्मी शुक्लांवर आरोप करण्यात आले होते.

98 मिलिटरी हार्डवेअर देशातच बनवणार; परदेशातून आयात करण्यावर बंदी; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशीकरणाची पाचवी यादी जाहीर केली

१९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तत्कालीन सरकारने याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची चौकशी सुरू असताना त्यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे केंद्रीय राखीव दलाच्या प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती.

Rashmi Shukla appointed as Director General of Police of Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात