विशेष प्रतिनिधी
पुणे : सारेगामापा लिटल चॅम्प मधून घराघरात पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे या जोडीने समाज माध्यमाच्या माध्यमातून आपलं प्रेम व्यक्त करत आपल्या नात्याची कबुली दिली. आणि सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. हे लाडके दोन लिटल चॅम्प्स एकत्र येत आता आपली लग्न गाठ बांधता आहेत. याचा आनंद त्यांच्या चाहत्यांना विशेष झाला. मुग्धा आणि प्रथमेश हे आपल्या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली.Saregamapa Little Champ Film Mugdha Vaishampa’s Kelvana Thaat
प्रथमेश आणि मुग्धाच लग्न हे अतिशय पारंपारिक आणि साध्या पद्धतीने होणार हे त्यांनी जाहीर केलं.या जोडीचं लग्न ठरल्याबरोबर त्यांच्या केळवणाची चर्चा ही जोरदार रंगली.एका सामाजिक संस्थेच्या वतीने प्रथमेशचा चिपळूण शहरात थाटामाटात केळवण झालं . आणि त्याची सर्वत्र समाज माध्यमात चर्चा रंगली.
तर आता त्यांच्या केळवणांना सुरुवात झाली आहे. मुग्धाच्या आजोळी नुकतंच तिचं केळवण थाटामाटात पार पडलं.मुग्धाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर तिच्या आजोळी पार पडलेल्या केळवणाचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये तिच्यासमोर पंचपक्वांचं ताट दिसत आहे. तर त्याभोवती मोत्यांची महिरपही मांडली आहे. तिच्या केळवण्यासाठी पारंपारिक पदार्थ बनवण्यात आले होते.
++
पुरणपोळी, करंजी, श्रीखंड, शिरा आणि जिलेबी हे गोड पदार्थ, तर सुरळीच्या वड्या, अळूची भाजी, बटाट्याची भाजी, वरण-भात हा मेन्यू होता. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “आजोळचं केळवण.” दरम्यान मुग्धा प्रथमेश हे आपल्या लग्नाची तारीख कधी जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App