Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख स्मारक समितीतून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा; शिंदेसेनेचा ठराव, दोन्ही शिवसेनेत संघर्षाची चाहूल

Uddhav Thackeray

प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशा मागणीचा ठराव सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांच्या आणि उपनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. शिंदेसेनेचे नेते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी करणार आहेत, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.Uddhav Thackeray

नोव्हेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोअर टीममधील विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी केली होती. त्या वेळी मोठा वाद उद‌्भवला होता. त्यावर भाजपने सारवासारव करत भाजपची अशी कुठलीही मागणी नसल्याचे फडणवीस यांनी सांगून वादावर पडदा टाकला होता. आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने उद्धव ठाकरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केल्याने हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.



बाळासाहेबांच्या जयंतीला शिंदेसेनेचा मेळावा

भाजपच्या प्रदेश अधिवेशनात शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल फुंकण्यात आले. त्यापाठोपाठ शिंदेसेनाही सक्रिय झाली आहे. वांद्रे (पश्चिम) येथील रंगशारदा सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक झाली. त्यात २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी बीकेसीमध्ये महत्त्वाची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य सत्कार केला जाईल. तसेच स्थानिक निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा केली जाईल. शिंदेसेना २४ ते २९ जानेवारीदरम्यान सदस्यता मोहीम राबवणार आहे. दरम्यान, मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्यास शिंदेसेना अनुकूल आहे. तसेच मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि पदे रिक्त करून नवीन नियुक्त्या करण्यावरही एकमत झाले. याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

१७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यानंतर २०१४ मध्ये फडणवीस सरकार आल्यावर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारणीसाठी समिती गठित करण्याचा जीआर काढण्यात आला.

सप्टेंबर २०१६ मध्ये फडणवीस सरकारने स्मारकासाठी विश्वस्त मंडळास मान्यता दिली. स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांची सदस्य सचिव म्हणून, तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय पूनम महाजन आणि स्मारकाचे आर्किटेक्ट शशिकांत प्रभू यांचाही सदस्य म्हणून समावेश आहे. ही नियुक्ती ५ वर्षांसाठी होती.

Shiv Sena chief Uddhav Thackeray should be removed from the memorial committee; Shinde Sena’s resolution, hints of conflict between both Shiv Senas

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात