Sharad pawar : महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा पवारांनी मुलाखतीत ठेवली पोटात; पण जाहीर सभेत आली ओठावर!!

Sharad pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sharad pawar महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी मुलाखतीमध्ये ठेवले आपल्या पोटातच, पण जाहीर सभेत मात्र आले ओठावर!!Sharad pawar

आतापर्यंत महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री पदाच्या बातम्यांच्या पुड्या पवारनिष्ठ माध्यमे सोडतच होती. परंतु पवार मनातले बोलायला काही तयार नव्हते. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत देखील त्यांनी तुम्ही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार का??, या प्रश्नावर उत्तर देताना नेमके उत्तर पोटातच ठेवले. ते ओठावर येऊ दिले नाही. सुप्रियाला संसदीय राजकारणातच रस आहे. विधिमंडळाच्या राजकारणात रस नाही. लोक काहीही म्हणत असले तरी शेवटी आपल्या पसंतीचाही विचार महत्त्वाचा असतो. त्यामुळे आमचे लोक निवडून आल्यानंतर एकत्र बसून निर्णय घेतील, असे पवार त्या मुलाखतीत म्हणाले. 2019 ला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची गरज होती पण आता तशी गरज नाही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत, अशी मखलाशी पवारांनी मुलाखतीमध्ये केली.



पण पवारांच्या मनातले मुलाखतीत जरी पोटातले ओठावर आले नाही, तरी जाहीर सभेत मात्र ओठावर यायचे राहिले नाही.

शिरूर मतदारसंघातल्या वडगाव रासाई मधल्या प्रचार सभेत बोलताना शरद पवारांच्या मनातले ओठावर आले. पवार म्हणाले, “आमच्या सत्ताकाळात राज्यामध्ये महिलांना 30 % आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला. आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे.”

पवारांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीमध्ये जरी आपल्या मनातले पोटातच ठेवले. पोटातले ओठावर येऊ दिले नाही, तरी जाहीर सभेत मात्र पोटातले ओठावर आले. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा वाढून महाविकास आघाडीतच मोठे घामासान तयार होऊ लागले आहे.

Sharad pawar wants to make woman chief minister in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात