“मी तसं बोललोच नाही”; “बाहेरून आलेल्या पवार” वक्तव्यावरून शरद पवारांची पलटी!!


विशेष प्रतिनिधी

सातारा : आधी असभ्य किंवा वादग्रस्त विधान करायचे आणि नंतर ते विधान अंगलट आले, की कानावर हात ठेवायचे, ही बड्या बड्या नेत्यांची सवय आहे. त्या बड्या नेत्यांमध्ये शरद पवारांचाही समावेश आहे. शरद पवारांनी पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांना उद्देशून “बाहेरून आलेल्या पवार” अशी असभ्य आणि अवांछित टीका केली होती. त्या टीकेवरून प्रचंड गदारोळ उठला होता. महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पण आता ती टीका आपल्या अंगलट आल्याचे पाहून पवारांनी आपण तसे बोललोच नव्हतो, अशा शब्दांमध्ये आजच्या साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत कानावर हात ठेवले!! आपल्या “त्या” वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा पवारांनी केला. आपण “तसे” बोललोच नाही, असे शरद पवार म्हणाले.Sharad pawar backtracked over his statement of “pawar from outside”!!



वास्तविक शरद पवारांना पुण्यातल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या एका वक्तव्यावरून प्रतिक्रिया विचारले होती. बारामतीतल्या मेळाव्यात अजित पवारांनी बारामतीकरांना उद्देशून तुम्ही आत्तापर्यंत साहेबांना निवडून दिले, मला निवडून दिले, मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना निवडून दिले, आता सुनेला निवडून द्या, असे वक्तव्य केले होते. त्यावर उत्तर देताना पवारांनी “मूळ पवार” आणि “बाहेरून आलेल्या पवार” यातला फरक लक्षात घ्या असे उत्तर दिले होते. ते उत्तर ऐकून पवारांच्या शेजारी बसलेले खासदार अमोल कोल्हे आणि मागे बसलेले पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप कुत्सितपणे हसले होते.

पवारांच्या त्या वक्तव्यावर महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये प्रचंड संताप उसळला होता. पवारांचेच अनुयायी राहिलेल्या रूपाली चाकणकर, चित्रा वाघ आदी महिला नेत्यांनी पवारांवर शरसंधान साधले होते. इतकेच नाहीतर कट्टर मोदी विरोधक अंजली दमानिया यांनी देखील त्याच वक्तव्यावरून पवारांना लक्ष्य केले होते. मात्र एरवी शरद पवार आणि प्रतिभा पवार तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारांची दुहाई देणाऱ्या सुप्रिया सुळे मात्र पवारांच्या त्या अवांछित वक्तव्यावर काहीही बोलल्या नव्हत्या.

पुण्यातले “ते” विधान आपल्या चांगलेच अंगलट आलेले पाहून पवारांनी साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका बदलून टाकली. मी तसं बोललेलो नव्हतो. मी जे बोललो होतो, ते पत्रकाराने विचारल्यामुळे, अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की, जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत:ला निवडून दिलं, ताईला निवडून दिलं, आता सूनेला निवडून द्या. त्यापुढे त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं. त्याच्या संबंधित मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळा काही अर्थ काढण्याची गरज नाही, असा दावा शरद पवारांनी केला.

पवारांनी आपल्या आधीच्या वक्तव्याचा इन्कार करताना आपण कसे महिलांचे मसीहा आहोत, आपणच कसे महिला धोरण राबवले वगैरे माखलाशी देखील केली.

या देशात महिलांच्या आरक्षणाचा पहिला निर्णय घेणारा मी राज्यातला पहिला मुख्यमंत्री होतो. शासकीय सेवेत आरक्षणाचा निर्णय माझा होता. मीच संरक्षण मंत्री असताना लष्करात मुलींना समाविष्ट करुन घेण्याचा निर्णय हा माझा होता. असे अनेक निर्णय आहेत, ज्या निर्णयांमध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घेण्याचा काळजी मी घेतली. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला सार्थ करण्यासाठी, त्याचा पाठपुरावा केला, असे शरद पवार म्हणाले.

Sharad pawar backtracked over his statement of “pawar from outside”!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात