2014 मध्येही शरद पवारांनी दाखविली होती धरसोड वृत्ती; प्रफुल्ल पटेलांपाठोपाठ छगन भुजबळांचाही गौप्यस्फोट!!

On Praful Patel's claim that 'Sharad Pawar was 50% ready to join hands with BJP in 2023

वृत्तसंस्था

नाशिक : अजित पवार हे शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात येण्यासाठी उत्सुक असताना शरद पवारांनी सुरुवातीला त्यांना पाठिंबा दिला होता ते त्यासाठी 50% अनुकूल देखील झाले होते, पण पवारांनी आयत्या वेळी कच खाऊन माघार घेतली, असा गौप्यस्फोट शरद पवारांचे निकटवर्ती नेते प्रफुल्ल पटेल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला दुजोरा दिलाच, पण त्यापुढे जाऊन त्यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला, तो म्हणजे पवारांनी फक्त 2019 किंवा 2023 मध्येच कच खाल्ली असे नाही, तर 2014 मध्ये देखील त्यांनी धडसोड वृत्तीच दाखवली होती याची आठवण छगन भुजबळ यांनी करवून दिली. On Praful Patel’s claim that ‘Sharad Pawar was 50% ready to join hands with BJP in 2023

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवारदेखील भाजपाबरोबर येण्यास 50 % अनुकूल होते, पण त्यांनी आयत्या वेळेस कच खाल्ली, असे प्रफुल्ल पटेल यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. अजित पवार गटातील नेत्यांनी पटेलांच्या वक्तव्याचे समर्थन केले, तर शरद पवार गटातील नेत्यांनी हा दावा चुकीचा असल्याचा दावा केला.

छगन भुजबळ यांनी पटेलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, मी पटेलांची मुलाखत ऐकली नाही. पण, शरद पवारांनी आधीसुद्धा भाजपाप्रणित एनडीएत जाण्याचा प्रयत्न केला होता. 2014 च्या निवडणुकीतही पवारांनी तसा प्रयत्न केला होता. तुम्हा सर्वांना आठवत असेल, 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना – भाजप मध्ये बिनसले होते, भाजपाचे बहुमतापेक्षा थोडे कमी आमदार निवडून आले होते, तेव्हा आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेसने) भाजपाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हापासूनच हे सगळे चालले आहे. शरद पवारांनी तेव्हा सुद्धा धरसोड वृत्तीच दाखवली होती.

प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, “मी आता या निवडणुकीत त्या दाव्यावर काहीही बोलणार नाही. मी याआधीदेखील या विषयावर बोललो आहे. परंतु, ते सत्य आहे.

– इतरांचाच आग्रह जास्त

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील भाष्य केले. पाटील म्हणाले, शरद पवार असे कधी म्हटले नाहीत. हेच लोक (प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार गटातील त्यांचे सहकारी) सतत जाऊन शरद पवारांकडे आग्रह करत असतील, त्यावर शरद पवार किती वेळा आणि काय-काय बोलणार?? शरद पवारांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. परंतु, त्यांनी नेहमीच मनाविरोधातल्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला. उलट शरद पवार यांना पक्षसंघटना एकत्रित ठेवायची होती, मजबूत ठेवायची होती, त्यामुळे असे कोणीही काहीही बोलत असतील तर शरद पवारांनी या लोकांची समजूत काढली असेल.

On Praful Patel’s claim that ‘Sharad Pawar was 50% ready to join hands with BJP in 2023

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात