स्टालिन अण्णांचा अहंकार उफाळला; म्हणाले, DMK संघटना पंतप्रधान, राष्ट्रपती बनवते; सरकारे घडवते – पाडते!!

the DMK organisation changes the government and its history

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी अजून सत्तेवर यायचा पत्ता नसताना आघाडीत न मिळणाऱ्या पंतप्रधान पदाची स्पर्धा मात्र सुरू झाली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख एम. के. स्टालिन यांचा अहंकार या निमित्ताने उफाळून आला आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम ही संघटना अशी आहे की, जी पंतप्रधान आणि राष्ट्रपती बनवते. सरकारे घडवते आणि मोडते, अशा शब्दांमध्ये स्टालिन यांनी आपला अहंकार बोलून दाखवला आहे. the DMK organisation changes the government and its history

हे तेच एम. के. स्टालिन आहेत, की ज्यांचा मुलगा उदयनिधी स्टालिन सनातन धर्माला डेंगी, मलेरिया, एचआयव्ही एड्स म्हणून त्याच्या निर्मूलनाच्या बाता मारल्या होत्या. सनातन धर्माचा त्याने अपमान केला होता. आता त्या पुढे जाऊन एम. के. स्टालिन यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम ही संघटना पंतप्रधान आणि राष्ट्रपती बनवते. सरकारे घडवते आणि मोडते. देशाचा इतिहास बदलते, असे दर्पयुक्त उद्गार काढले आहेत.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेचे नेते इडापड्डी पलानीस्वामी यांनी एम. के. स्टालिन यांना पंतप्रधान पदाची महत्त्वकांक्षा असल्याची टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना स्टालिन यांचा अहंकार उफाळून आला आणि त्यांनी वर उल्लेख केलेले दर्पयुक्त उद्गार काढले. स्टॅलिन म्हणाले, “एआयएडीएमके केंद्र सरकारसोबत असताना त्यांनी तामिळनाडूसाठी काहीही चांगले केले नाही. पलानीस्वामी रोज सांगतात की स्टॅलिन पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहात आहेत, पण द्रमूक ही एक संघटना आहे, जी पंतप्रधान आणि राष्ट्रपती बनवते. जेव्हा केंद्रात लोकशाही धोक्यात येते, तेव्हा द्रमुक संघटना सरकार आणि आपला इतिहास बदलते.

बाकी द्रविड मुन्नेत्र कळघमने अनेकदा आघाड्या बदलून केंद्रात कधी भाजपला तर कधी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे, पण त्या पक्षाच्या संघटनेमुळे पंतप्रधान बदलल्याचा इतिहास नाही.

the DMK organisation changes the government and its history

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात