सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाही!


पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी असणार


विशेष प्रतिनिधी

ईडीच्या अटकेविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळालेला नाही. तसेच, अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला २४ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे.There is no relief for Arvind Kejriwal from the Supreme Court



अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही आणि तपास यंत्रणा ईडीने केलेली त्यांची अटक योग्य असल्याचे सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

केजरीवाल यां ना अंमलबजावणी संचालनालयाने 21 मार्च रोजी अटक केली होती आणि ते 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. केजरीवाल सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहेत आणि येथून ते दिल्लीचे सरकार चालवत आहेत.

There is no relief for Arvind Kejriwal from the Supreme Court

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात