Sanjay raut शरद पवारांच्या निवृत्तीचे संकेत फसवे; संजय राऊत मदतीला धावले!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay raut  शरद पवारांच्या निवृत्तीचे संकेत फसवे; संजय राऊत मदतीला धावले!! असेच आज अपेक्षेप्रमाणे घडले. शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत काल शिर्सुफळ येथे भाषण करताना निवृत्तीचे संकेत दिल्याचे बोलले गेले. तशा बातम्या मराठी माध्यमांनी प्रसारित केल्या. परंतु प्रत्यक्षात शरद पवारांनी बारामती वाचवण्यासाठी इमोशनल कार्ड खेळले होते, तेच संजय राऊत आज मदतीला धावल्याने सिद्ध झाले. Sanjay raut

शरद पवारांनी शिर्सुफळ मध्ये बोलताना आपली राज्यसभेत आता दीड वर्षांचीच मुदत शिल्लक राहिली आहे. त्यामुळे इथून पुढे राज्यसभेत जायचे की नाही हे ठरवावे लागेल. आतापर्यंत 14 निवडणूक लढलो तुम्ही सतत निवडून दिले मला कधी घरी पाठवले नाहीत पण मी निवडणूक तर कुठलीच लढवणार नाही, असे सांगून पवारांनी स्वतःच्या निवृत्तीचे संकेत दिले त्याचवेळी बारामतीच्या विकासासाठी नवी पिढी तयार करायची म्हणून युगेंद्र पवारांसाठी मते मागितली. Sanjay raut

मात्र पवारांचे हे इमोशनल कार्ड आहे हे नंतर स्पष्ट झाले. शिवसेनेचे प्रवक्ते आणि पवारांचे कट्टर समर्थक संजय राऊत यांच्या मदतीला धावले आजच्या नियमित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शरद पवार नेहमीच निवृत्तीची भाषा बोलतात. त्यांनी काल काही नवे सांगितले नाही, पण आम्हाला त्यांच्यासारख्या मार्गदर्शकाची गरज आहे. त्यांच्यासारखे सेनापती आम्हाला हवे आहेत. त्यांनी पाठीवर हात ठेवून लढ म्हणावे, असे सांगितले. शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत देऊन आपल्या समर्थकांना “जागे” केले आणि अपेक्षेप्रमाणे संजय राऊत यांच्या मदतीला धावले हेच यातून दिसून आले. Sanjay raut

Sanjay raut “exposed” pawar retirement plans

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात