विशेष प्रतिनिधी
सांगली : सत्ता आली नाही, तर आपल्याला कुत्रंही विचारणार नाही, अशा शब्दांमध्ये जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या मनातली भीतीच बोलून दाखवली. त्यांनी कुत्र्याचा संदर्भ जरूर बंडखोरांसाठी दिला, पण प्रत्यक्षात महाविकास आघाडी साठी महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक किती महत्त्वाची आहे आणि सत्ता आली नाही, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची काय अवस्था होईल, हेच जयंत पाटलांनी उघडपणे बोलून दाखविले. Jayant patil feared MVA may not get power again
सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेत जयंत पाटलांनी बंडखोरी करणाऱ्या प्रत्येकाला इशारा दिला सत्ता येईल तेव्हा पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा कोणालाही घाई नाही पण सत्ता जर आली नाही तर आपल्याला कुत्रंही विचारणार नाही हे विसरू नका. जी लोक बंडखोरे करण्यासाठी आज मोठ्या आवाजात बोलतायेत ती माणसं घरी जाऊन निवांत बसतील रिटायर्ड होतील. त्यामुळे कुठल्यातरी छोट्या गोष्टींमध्ये मन अडकवून नुकसान करून घेऊ नका सत्ता येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा पण सत्ता आली नाही तर आपल्याला कुत्रंही विचारणार नाही हे लक्षात ठेवा, अशा शब्दांमध्ये जयंत पाटलांनी बंडखोरांना इशारा दिला.
पण प्रत्यक्षात जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतल्या प्रत्येक नेत्याच्या मनातली ही भीतीच बोलून दाखवली. कारण मूळात महाविकास आघाडी बनली तीच मुळी सत्तेसाठी जर सत्ताच आली नाही, तर महाविकास आघाडी कोसळून पडेल. सगळे पक्ष बिखरून जातील. कुठे जॉईन पाटलांचे राष्ट्रवादीमध्ये आणखी मोठी फूट पडून त्यांचे निवडून आलेले आमदार ते सत्तेच्या वळचणीला निघून जातील, ही भीती जयंत पाटलांना वाटल्यानेच त्यांनी सत्ता आली नाही, तर आपल्याला कुत्रही विचारणार नाही ही मनातली भीती बोलून दाखवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App