वृत्तसंस्था
पुणे : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट ९१.०६ टक्के झाला आहे. बुधवारी ५१ हजार ४५७ जणांनी ची करोनावर मात केली. Reduction in the number of corona patients in the state; 51457 people Recovered in 24 hours
एका दिवसात ३४ हजार ३१ नवे रुग्ण आढळले आहेत. ५९४ जणांचा मृत्यू झाला. सध्या १.५४ टक्के मृत्यूदर आहे. ३० लाख ५९ हजार ९५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर २३ हजार ८२८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत.
आजपर्यंत ३ कोटी १८ लाख ७४ हजार ३६४ जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी ५४ लाख ६७ हजार ५३७ जणांना लागण झाली आहे. सध्या ४ लाख १ हजार ६९५ सक्रीय रुग्ण आहेत.
पुण्यात आढळले ११६४ रुग्ण
पुण्यात बुधवारी १ हजार १६४ रुग्ण आढळले एकूण ४ लाख ६२ हजार १७२ रुग्णसंख्या झाली आहे. बुधवारी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण ७ हजार ८४३ जण मृत्यू पावले आहेत. दरम्यान, २ हजार ४०७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एकूण ४ लाख ३९ हजार ९७ जण कोरोनामुक्त झाले.
मुंबईत आढळले 1350 रुग्ण
मुंबईत २४ तासात १३५० नव्या रुग्णांची नोंद झाली. ४,५६५ जणांना घऱी सोडले आहे.रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के आहे. सध्या२९,६४३ सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर २६९ दिवसांवर पोचला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App