नांदेडमधील रुग्णालयातील रूग्णांच्या मृत्यूंच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा सवाल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये 12 नवजात (6 मुले, 6 मुली) अर्भके, सात महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे. ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून, यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. Raj Thackeray targets the state government over the death of hospital patients in Nanded
राज ठाकरे म्हणतात, ”नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत.”
याशिवाय ”तीन-तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.” असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारचे कान टोचले आहेत.
नांदेडच्या सरकारी रुग्णालयात ठाण्याची पुनरावृत्ती, अवघ्या 24 तासांत 24 जणांचा मृत्यू
तर 30 सप्टेंबर रात्री 12 ते 1 ऑक्टोबर रात्री 12 वाजेदरम्यान या सर्व रूग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. यात चौघांना हृदयविकाराचा झटका, एक विषबाधा, एक जठरव्याधी, 2 किडनी व्याधी, एक प्रसूती गुंतागुंत व 3 अपघातातील रुग्णांचा समावेश आहे. 4 बालकांना अत्यवस्थ स्थितीत खासगी रुग्णालयातून रेफर झाले होते. दरम्यान, अजून 70 रुग्ण गंभीर अवस्थेत असून राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App