विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड मधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 31 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयातल्या आरोग्य व्यवस्थांचे कसे वाभाडे निघालेत, याचे चित्र समोर आले. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटलांनी त्या रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता त्यांना ठिकठिकाणी अस्वच्छता आढळली. रुग्णालयातले सफाई कर्मचारी रुग्णालयात काम न करता रुग्णालयातल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी काम करत असल्याचे लक्षात आले. 31 patients died in government hospital of Nanded
या संतापातून खासदार हेमंत पाटलांनी रुग्णालयाचे डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांना हातात झाडू घेऊन टॉयलेट साफ करायला लावले आणि हातात नळी घेऊन त्यांनी स्वतः त्या टॉयलेट मध्ये पाणी टाकले.
रुग्णालयातील डॉक्टरांवर आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. रुग्णालयातले एक्स-रे मशीन पासून सगळी अत्याधुनिक यंत्रणा बंद आहे. त्याची 65 लाख रुपयांची दिले झाली आहेत. ती बिले काढण्यामध्येच डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांना इंटरेस्ट आहे, पण जनसामान्यांच्या सेवेत इंटरेस्ट नाही, असा आरोप खासदार पाटलांनी केला.
नांदेडच्या या शासकीय रुग्णालयात 260 सफाई कर्मचारी नोकरीला आहेत, पण ते सगळे रुग्णालयातले अधिकाऱ्यांनी स्वतःच्या घरी खासगी कामासाठी ठेवले आहेत. त्यामुळे हे सफाई कर्मचारी रुग्णालयात येऊन सफाई करत नाही, याविषयी खासदार पाटलांनी संताप व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App