न्यूजक्लिक वेबसाईटच्या 10 पत्रकारांच्या 30 ठिकाणांवर पोलिसांनी छापे घातले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनसोबतच्या निधीच्या वादात दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिक पत्रकारांच्या (रेड ऑन न्यूजक्लिक जर्नलिस्ट) जागेवर छापे टाकले असून अनेक लोकांची चौकशी केली जात आहे. आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. Union Minister Anurag Thakurs reaction to the ongoing raids on the Newsclick case
ते म्हणाले, “मला याचे समर्थन करणे योग्य वाटत नाही. जर कोणी काही चुकीचे केले असेल तर तपास यंत्रणा त्यावर काम करतात. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे घेतले असतील किंवा काही आक्षेपार्ह कृत्य केले असेल तर असे कुठेही लिहिलेले नाही की, एजन्सी कारवाई करू शकत नाही. पास यंत्रणा स्वतंत्र आहेत आणि ते नियमानुसार कारवाई करतात.”
चीन मधून हवाला रॅकेट मार्फत पैसा मिळवून भारतात “लिबरल” वेबसाईट चालवणाऱ्या न्यूजक्लिक वेबसाईटच्या 10 पत्रकारांच्या 30 ठिकाणांवर पोलिसांनी छापे घातले. त्यानंतर या पत्रकारांची आणि त्यांच्या जोडीला लिबरल्सची व्हिक्टीम कार्ड गेम सुरू झाली आहे.
न्यूजक्लिकला चिनी निधी : पोलिसांचे नोएडा, गाजियाबादसह 30 ठिकाणी छापे; लिबरल्सची व्हिक्टीम कार्ड गेम सुरू!!
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यूजक्लिक पत्रकार उर्मिलेश, ओनिंदो चक्रवर्ती आणि अभिसार शर्मा यांच्यासह ७ पत्रकारांच्या घरांसह न्यूजक्लिक वेबसाइटशी लिंक असलेल्या 30 हून अधिक ठिकाणी छापे घातले. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App