वृत्तसंस्था
इडुक्की : केरळमध्ये इडूक्की जिल्ह्यातील एक ख्रिश्चन फादर कुरियाकोस मट्टम यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या काही तासांमध्ये चर्चा वरिष्ठ धर्मगुरूंनी त्यांना धर्मोपदेशक पदावरून हटविले.Kerala: Hours after Catholic priest joins BJP, church removes him from vicar duties
केरळ मधले ख्रिस्ती धर्मगुरू स्वतःला लिबरल समजतात, पण त्यांच्यापैकीच एका धर्मगुरूंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या धर्मगुरूला धर्मोपदेशक पदावरून त्यांनी हटविले.
मणिपूर मधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर केरळ मधली चर्चेसनी भाजप विरोधात भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्यातलाच एक धर्मोपदेशक भाजपमध्ये प्रवेश करतो हे चर्च ॲथॉरिटीजना सहन झाले नाही आणि त्यातूनच फादर कूरियस मट्टम यांच्यावर कारवाई झाली. फादर मट्टम येत्या महिनाभरातच निवृत्त होणार होते, पण त्यांना केवळ भाजप प्रवेशाचे निमित्त करून आधीच पदावरून हटविण्यात आले.
केरळच्या चर्चेस मधील कोणीही अधिकाऱ्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवू नयेत असा नियमाचा बडगा त्यासाठी उगारण्यात आला, पण प्रत्यक्षात केरळच्या चर्चेस मधील अनेक वरिष्ठ धर्मोपदेशक काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची राजकीय जवळीक साधून असल्याची उदाहरणे आहेत. या जवळीकीतूनच मणिपूर मधल्या हिंसाचाराबद्दल केरळ चर्च असोसिएशनने भाजप विरोधात भूमिका घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App