कंप होताच लोक घाबरले आणि घरातून व कार्यालयातून रस्त्यावर आले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. जवळपास एक मिनिट भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजल्या गेलीआहे. याशिवाय लखनऊ आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंप दुपारी 2:53 वाजता झाला. Strong earthquakes in Lucknow and Uttarakhand along with Delhi NCR
कामाचा दिवस असल्याने सेवा क्षेत्रातील लोक कार्यालयात काम करत होते. जमीन हादरताच कार्यालये आणि घरांमध्ये घबराट पसरली. भूकंप होताच लोक घाबरले आणि घरातून व कार्यालयातून रस्त्यावर आले. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे घर व कार्यालयांमधील पंखे, दिवे अशा वस्तू हलताना दिसत होत्या. नोएडामध्ये 10 ते 15 सेकंद सतत भूकंपाचे धक्के जाणवत होते. तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि बरेली येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App