शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या १०० व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार


विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात अभिष्टचिंतन केले जात आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी स्वत: उपस्थित होते. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार केला. शिवचरित्र सागरासारखे विशाल आहे. ते मी अजून समजून घेतो आहे, अशा कृतज्ञ भावना बाबासाहेबांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. Raj Thackeray felicitated Babasaheb Purandare on his 100th Birthday Celebration In Pune

बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात २० बाय १५ फूटी रांगोळी साकारण्यात आली आहे. तसेच ९९ दिवे प्रज्वलित देखील करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.



बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर १२ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्रभूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात.

https://youtu.be/jjT2-mp-ygo

Raj Thackeray felicitated Babasaheb Purandare on his 100th Birthday Celebration In Pune

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात