Pawar NCP : एरवी सनातन धर्मावर टीकाटिप्पणी, पण आता नवरात्राच्या 9 दिवसांचा पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलनासाठी वापर!!

Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एरवी सनातन धर्मावर आणि सनातन धर्मातील साधू संतांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या किंवा साल्यांनो तुमच्या देवांचे बाप आम्ही आहोत, असे म्हणणाऱ्या शरद पवारांच्या (Pawar  ) राष्ट्रवादी काँग्रेसने शारदीय नवरात्राच्या 9 दिवसांचा वापर आंदोलनासाठी करून घ्यायचे ठरविले आहे. त्या आंदोलनाला महिला जागर असे नाव दिले आहे.



शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःला पुरोगामी पक्ष म्हणवत असते. शरद पवार देखील अनेक “पुरोगामी” कार्यक्रमांना हजेरी लावून सनातन धर्माविषयी किंवा सनातन धर्मातील साधुसंतांविषयी टीकाटिप्पणी करत असतात. मध्यंतरी शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी अक्कलकोट स्वामी समर्थांबद्दल अश्लाघ्य उद्गार काढले होते. त्यावेळी पवार किंवा शाहू महाराजांनी त्यांना रोखले नव्हते. त्याविषयी महाराष्ट्रात प्रचंड संताप उसळला होता. त्याआधी एका कार्यक्रमात शरद पवारांनी साल्यांनो, तुमच्या देवांचे बाप आम्ही आहोत, एका बंडखोर कवीच्या कवितेचा आधार घेऊन सांगितले होते. त्यावरून देखील महाराष्ट्रात संताप झाला होता.

मात्र, आता नवरात्राच्या 9 दिवसांचा वापर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी करून घ्यायचे ठरविले आहे. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्याबद्दल नवरात्रातले 9 दिवस दुपारी 12.00 ते 3.00 अशा वेळेत आंदोलन करून महायुती सरकारला घेरायचा पवारांच्या पक्षाचा इरादा आहे. या आंदोलनाचे नेतृत्व विद्या चव्हाण करणार आहेत. पण याच विद्या चव्हाणांवर सुनेचा छळ केल्याचा आरोप आहे. या संदर्भात केस सुरू आहे.

Pawar NCP will “use” navratri for women agitation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात