Thailand : थायलंडमध्ये स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू, टायर फुटल्याने अपघात; 5 शिक्षकांसह 44 जण होते स्वार

Thailand

वृत्तसंस्था

बँकॉक : थायलंडमध्ये  ( Thailand  ) स्कूल बसला लागलेल्या आगीत 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, बसमध्ये एकूण 44 मुले होती, त्यापैकी 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कर्मचाऱ्यांनी उर्वरित मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, बसचे टायर फुटल्याने आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकच्या खु खोत परिसरात दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. बस शाळेच्या सहलीवरून परतत होती. त्यात ५ शिक्षकही उपस्थित होते.



परिवहन मंत्री म्हणाले- बस सीएनजीवर धावत होती

थायलंडचे पंतप्रधान पायटोंगटार्न शिनावात्रा यांनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या मुलांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांनी परिवहन मंत्र्यांना घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.

देशाचे गृहमंत्री अनुतिन चर्नविराकुल यांनी सांगितले की, बचाव कर्मचारी आल्यानंतरही बस इतकी गरम होती की आत जाणे कठीण होते. त्यामुळे अपघातानंतर बराच वेळ मृतदेह बसमध्येच पडून होते. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

थायलंडच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, बस कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) वर चालत होती. ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी मंत्रालयाला अशा प्रवासी वाहनांसाठी सीएनजी सारख्या इंधनाच्या वापरावर बंदी घालण्याची आणि दुसरा पर्याय शोधण्याची मागणी केली आहे.

School bus fire in Thailand, 25 students dead, tire burst accident; There were 44 riders including 5 teachers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात