वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात आजपर्यंत एक कोटी लोकांना कोरोनाविरोधी लशीचे डोस देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ आरोग्य अधिका-यांनी रविवारी दिली.राज्याचे प्रधान आरोग्य सचिव प्रदीप व्यास म्हणाले, प्रशासनाने राज्यात दुपारपर्यंत 1,00,38,421 कोरोनाविरोधी लसीचे डोस दिले आहेत.new record in the name of the country, the corona vaccine to more than 100 million people in 85 days; The US and China were also left behind
16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु झाले. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि 45 वर्षांवरील व्यक्तींचा समावेश होता.राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे शनिवारी म्हणाले,
राज्याला 1.10 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह गुजराथ आणि राजस्थानला 1 कोटींपेक्षा जास्त डोस दिले आहेत. त्यामुळे लस पुरवठ्यात राजकारण करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रापेक्षा अन्य लहान राज्यांना लसीचे अधिक डोस दिल्याचा आरोप केला होता. त्यावर ते बोलत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App