विशेष प्रतिनिधी
मुंबई : लायकी नसणाऱ्या माणसांच्या हाताखाली मराठ्यांच्या पोरांना काम करायला लागते, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी सरकारी अधिकाऱ्यांची लायकी काढली होती, पण तीच त्यांच्या अंगलट आली म्हणून मग त्यांनी माघार घेतली!!, असे आज घडले. Manoj Jarange Patil took out the suit, the exact same thing came.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलन आक्रमक भाषा वापरतात अशी टीका होतच आहे. त्यातच त्यांचे एक भाषण टीकेला कारणीभूत ठरले. पुण्यातल्या खराडीत बोलताना जरांगे पाटलांनी लायकी नसलेल्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली मराठ्यांच्या पोरांना काम करायला लागते, असे वक्तव्य केले.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवल्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी सरकारला लगावला टोला!
त्यावर छगन भुजबळाने मराठेतर बहुजनांमधली मोठमोठी नावे घेऊन यांची लायकी नव्हती का??, असा बोचरा सवाल केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना लायकी या शब्दावरूनच पत्रकारांनी वारंवार छेडले. त्यामुळे जरांगे पाटील चिडले आणि तुम्ही लायकी हाच शब्द लावून धरता. तो शब्दच मी माघारी घेऊन टाकतो, असे सांगून माघार घेतली.
बाकी मराठा आरक्षण ओबीसी मधून घेणारच, या जुन्यास भूमिकेचा त्यांनी पुनरूच्चार केला. छगन भुजबळ जातिवादी बोलतात. पुण्यातल्या विजय स्तंभाचा विषय काढून त्यांनी जातीभेदच पसरवायचा प्रयत्न केला, असा आरोप जरांगे पाटलांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App